Diwali Recipe 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Recipe 2022 : दिवाळीत अचूक प्रमाणात बनवा शेवचे लाडू

दिवाळीच्या फराळात नेहमी बनवला जाणारा पदार्थ शेवचे लाडू

कोमल दामुद्रे

दिवाळी म्हटलं की, गोडाचे पदार्थ हमखास येतात त्यात फराळही आलंच. फराळ बनवताना काही वेळेस तो चुकतो. सण-उत्सवात एक वेगळेच वातावरण असते. लोक घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात, विशेषतः मिठाई. मिठाई हा भारताच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याला सणात विशेष स्थान आहे. त्यातीलच एक लाडू. लाडवाचे प्रकार अनेक असले तरी, रव्याचे किंवा बेसनाचे लाडू हमखास बनवले जातात. दिवाळीच्या (Diwali) सणात शेवच्या लाडूला विशेष महत्त्व आहे. पण आज आम्ही तुम्हाला फराळातला शेवचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत (Latest Marathi News)

साहित्य

  • दिड किलो बेसन

  • 1 चमचा हळद

  • 3 ग्लास पाणी (Water)

  • तेल

पाक बनविण्यासाठी साहित्य -

  • सव्वा 1 किलो साखर

  • दिड ग्लास पाणी

  • बाकी साहित्य -

  • 1 वाटी मनुके

  • 1 वाटी काजूचे तुकडे

  • 1 वाटी वितळलेलं तूप

  • पाव वाटी वेलची पूड

  • 500 ग्रॅम बेसनपीठाला ला 400 ग्रॅम साखर घ्या आणि साखर बुडेल इतके पाणी टाका.(अर्धा ग्लास)

  • 1 किलो बेसनपीठाला 800 ग्रॅम साखर घ्या आणि साखर बुडेल इतके पाणी टाका.(1 ग्लास)

कृती

  1. सर्वात आधी १ किलो चणाडाळ उन्हात वाळवून दळून आणा.

  2. एका परातीत हे पीठ घेवून त्यात किंचित मीठ व आवश्यक पाणी घालून मळून (थोडे सैलसर) घ्यावे.

  3. थोडे थोडे पीठ साच्यात घालून याची बारीक शेव पाडा व तळून घ्या.

  4. तळलेली शेव कुस्करून घ्या.

  5. आता पाक करण्यासाठी गॅस वर १ मध्यम आकाराचा ग्लास (२ कप) पाणी गरम करत ठेवा.

  6. यात पाऊन किलो साखर घालून १ तारी पाक बनवून घ्या.

  7. गॅस बंद करून यात जायफळ व वेलची पावडर घाला. आवडत असल्यास मनुके व काजूचे तुकडे घाला.

  8. कुस्करून ठेवलेली शेव घालून चांगले हलवून मिक्स करा. ५ मि. झाकण ठेवून तसेच ठेवावे.

  9. ५ मिनिटानंतर लाडू वळवून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT