Diwali Acidity Relief Drink Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Acidity Relief Drink : फराळाचे खा खा खाल्ले? अपचनाचा त्रास होतोय? ही पेय प्या, मिळेल आराम

Acidity Problem : आपल्या छातीत सतत जळजळ होते, पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी काही घरगुती उपायांचा वापर केल्यास आराम मिळेल.

कोमल दामुद्रे

Home Remedies For Bloating Problem :

दिवाळी म्हटलं की, या काळात अनेक पदार्थांची चव चाखायला मिळते. शंकरपाळी, करंजी, चकलीसोबत गोडाचे पदार्थ ही खाल्ले जातात. सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण अतिप्रमाणात पदार्थांचे सेवन करतो.

या दिवसांमध्ये भरपूर खाल्ल्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तेलाचे आणि गोडाचे पदार्थ खाल्ल्यामुळे सणासुदीच्या (Festival) काळात आपल्या छातीत सतत जळजळ होते, पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी काही घरगुती उपायांचा (Home Remedies) वापर केल्यास आराम मिळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. जिऱ्याचे पाणी

जिऱ्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे अपचन, पोटदुखीच्या (Stomach Pain) समस्येपासून आराम मिळतो. यासाठी जिरे पाण्यात उकळून घ्या. एका कपमध्ये गाळून त्यात मध घालून प्या. आराम मिळेल.

2. ओव्याचे पाणी

ओव्यामध्ये शरीराला निरोगी ठेवण्यासाठीचे अनेक गुणधर्म आहेत. याच्या वापर केल्यास गॅस, अपचन, सर्दी, खोकला अशा अनेक समस्या दूर होतात. याचा वापर करण्यासाठी ओवा चावून खा, त्यानंतर ४५ मिनिटांनी कोमट पाणी प्या आराम मिळेल.

3. वेलचीचे पाणी

वेलचीच्या कळ्या पाण्यात टाकून ५ ते ७ मिनिटे उकळा. त्यानंतर अर्ध्यातासाने पाणी प्या. तसेच पुदिन्याची पाने पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटाला आलेली सुज किंवा पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT