Diwali Safety Tips Saam TV
लाईफस्टाईल

Diwali Safety Tips : फक्त फुफ्फुसं नाही, तर हृदय अन् कानांनाही फटाक्यांचा धोका; टाळा 'या' ७ गंभीर चुका

Firecracker Health Effects : दिवाळीच्या फटाक्यांमधून निघणारा धूर, सूक्ष्म धूलिकण आणि मोठा आवाज शरीराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. यामुळे डोळ्यांची जळजळ, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि कानांच्या समस्या उद्भवू शकतात.

Shreya Maskar

दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात.

फटाक्यांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

फटाक्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते.

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि रोषणाईचा सण आहे. या सणात फराळाची मेजवानी केली जाते. तसेच दिव्यांनी रोषणाई करतात आणि फटाके फोडतात. मात्र फटाक्यांमधून निघणारा धूर, विषारी वायू, सूक्ष्म धूलिकण आणि मोठ्या आवाजाचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच दमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी दिवाळीत स्वतःची विशेष काळजी घ्यावी. फटाक्यांचा परिणाम केवळ डोळे किंवा फुफ्फुसांपुरता मर्यादित नसतो. त्वचा, कान, श्वसनसंस्था आणि हृदयाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

फटाक्यांचा शरीरावर होणारा वाईट परिणाम

फुफ्फुसे

फटाके फोडल्यानंतर हवेत सूक्ष्म धूलिकण, धूर आणि विविध रासायनिक घटक पसरतात. हे कण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे खोकला आणि घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा, दम्याचा त्रास आणि फुफ्फुसांमध्ये जळजळ या समस्या उद्भवतात.

डोळ्यांमध्ये जळजळ

फटाक्यांच्या धुरातील रासायनिक घटक आणि धूलिकण डोळ्यांच्या संपर्कात आल्यास डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, खाज सुटणे, डोळ्यांमध्ये जळजळ या समस्या उद्भवतात. फटाक्यांचे जळते कण डोळ्यांत गेल्यास कॉर्नियाला इजा होऊ शकते. त्यामुळे दृष्टीवरही परिणाम होण्याची शक्यता असते.

कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम

फटाक्यांचा मोठा आवाज कानांसाठी धोकादायक ठरू शकतो. अचानक मोठा आवाज झाल्यामुळे कानातील नाजूक पेशींना नुकसान होऊ शकते. यामुळे कानात सतत शिट्टी आवाज येणे, कान दुखणे, ऐकू कमी येणे या समस्या निर्माण होतात. अतिशय मोठ्या आवाजाच्या जवळ फटाके फोडल्यास कायमस्वरूपी श्रवणदोष होण्याचा धोका असतो.

हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

फटाक्यांमधून निर्माण होणारे प्रदूषण आणि मोठा आवाज शरीरातील तणावाची प्रतिक्रिया वाढवू शकतात. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तात्पुरते वाढू शकतात.हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी प्रदूषित वातावरणात जास्त वेळ राहणे टाळावे.

त्वचेवर भाजणे- जखमा होणे

फटाक्यांमधील उष्णता, जळते कण आणि रासायनिक पदार्थ त्वचेच्या संपर्कात आल्यास भाजण्याची शक्यता असते. तसेच फटाके फोडताना फटाक्यांचा चटका देखील लागतो. यात त्वचा लाल होणे, फोड येणे, त्वचेवर जखमा होणे यांचा समावेश आहे.

डोकेदुखी

मोठ्या आवाजामुळे काही व्यक्तींना डोकेदुखी, चिडचिड, झोपेचा त्रास किंवा अस्वस्थता जाणवू शकते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आवाजाबाबत संवेदनशील असलेल्या व्यक्तींना हा त्रास अधिक जाणवू शकतो.

गर्भवती महिला- लहान मुलांवर परिणाम

गर्भवती महिलांनी फटाक्यांच्या धुरापासून आणि मोठ्या आवाजापासून शक्यतो दूर राहावे. वायुप्रदूषणाचा गर्भधारणेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. लहान मुलांची श्वसनसंस्था विकसित होत असते. त्यामुळे प्रदूषणाचा त्रास त्यांना अधिक होऊ शकतो. मुलांना फटाके हाताळताना कधीही एकटे सोडू नये.

दिवाळीमध्ये फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी?

  • फटाके फोडण्यासाठी मोकळी जागा निवडा

  • धुरापासून स्वतःचे संरक्षण करा

  • फटाके फोडताना सुती आणि शरीराला व्यवस्थित बसणारे कपडे घाला.

  • लहान मुलांवर लक्ष ठेवा

  • न पेटलेले फटाके पुन्हा पेटवू नका

  • फटाक्यांचे जळते कण डोळ्यांत जाऊ नयेत यासाठी सुरक्षित अंतर ठेवा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मुंबई-बेंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेन हाऊसफुल्ल! तिकीटही मिळेना, कधीपर्यंत आहे वेटिंग?

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; देशात राबवली जाणार SSR प्रक्रिया, कोणत्या ६ राज्यात होणार SSR

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे पेण विधान सभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांचा राजीनामा

Jeera Pani on Skin: चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी करायचेय? जिऱ्याच्या पाण्याचा असा करा वापर

राष्ट्रवादीला मोठा धक्का! दिग्गज नेत्याचा सुनील तटकरेंकडे राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT