Indian diet recommendations ICMR saam tv
लाईफस्टाईल

ICMR Indian diet study: भारतीयांच्या थाळीतच लपलंय आजारांचं मूळ; ICMR च्या अभ्यासात धक्कादायक तथ्य

Indian diet recommendations ICMR: अभ्यासानुसार, भारतीयांच्या रोजच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचे अति-प्रमाण आणि प्रोटीनचे (Protein) कमी प्रमाण असल्यामुळे देशामध्ये मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity) आणि इतर चयापचय विकारांच्या (Metabolic Disorders) दरात लक्षणीय वाढ होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारतीय आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त आहे

  • ६२% ऊर्जा कार्बोहायड्रेटमधून मिळते

  • प्रोटीन कमी आणि सॅचुरेटेड फॅट जास्त आहे

भारतीय व्यक्तींच्या जेवणामध्ये सामान्यपणे डाळ आणि भात यांचा समावेश असतो. अशातच आता भारतातील आहाराबद्दल ICMR आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन यांच्या नव्या अभ्यासाने एक चिंताजनक सत्य स्पष्ट केलंय. या अभ्यासानुसार, भारतीयांच्या दैनंदिन थाळीत कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त आहे.

या संशोधनातून असं समोर आलं आहे की, लोक त्यांच्या एकूण ऊर्जेच्या गरजेच्या सुमारे 62% उर्जा कार्बोहायड्रेटमधून घेतात आणि हे बहुतेक पांढरा भात आणि प्रक्रिया केलेल्या धान्यांमधून मिळतं. असा आहार आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे कोणते धोके वाढत असून icmr चं म्हणणं काय आहे ते पाहूयात.

ICMR च्या रिपोर्टमध्ये काय समोर आले?

या अभ्यासात 30 राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि दिल्ली-एनसीआर मधील 20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांच्या घराघरांत जाऊन माहिती गोळा केली. अभ्यासातून दिसलं की, भारतीयांच्या रोजच्या आहारात प्रोटीनचं प्रमाण कमी आणि सॅचुरेटेड फॅटचं प्रमाण जास्त आहे. जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट घेणं टाइप-2 डायबीटीस, लठ्ठपणा आणि पोटाभोवती चरबी वाढण्याचा धोका वाढवतं.

रिपोर्टनुसार, कमी कार्बोहाइड्रेट घेतलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त कार्बोहाइड्रेट घेणाऱ्यांना डायबिटीजचा धोका 30%, लठ्ठपणाचा धोका 22% आणि पोटावर चरबी वाढण्याचा धोका 15% जास्त आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मते, भारतीय लोकांच्या ताटात थाळीत भात आणि पोळीचं प्रमाण जास्त असतं पण प्रोटीन कमी मिळतं. प्रोसेस्ड आणि साधं कार्बोहाइड्रेट दोन्ही डायबिटीजचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे रिफाइंड पीठाच्या पोळ्यांऐवजी फायबरयुक्त धान्य वापरणं फायदेशीर आहे. तसंच जास्त पॉलिश केलेला पांढरा तांदूळ कमी प्रमाणात आणि जागरूकतेनं वापरावा.

तज्ज्ञांचं मत आहे की, थोडी आहारशैली बदलली तर मेटाबॉलिक आजारांपासून बचाव शक्य आहे.

बचावाचे उपाय काय?

या रिसर्चमध्ये स्पष्टपणं म्हटलं आहे की, मेटाबॉलिक आजारांचा धोका कमी करण्यासाठी पुढील गोष्टी अत्यावश्यक आहेत

  • आहारातील कार्बोहायड्रेट आणि सॅचुरेटेड फॅट कमी करणं

  • प्रोटीनयुक्त आणि वनस्पतीआधारित अन्नाला प्राधान्य देणं

  • नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायाम जीवनशैलीचा भाग बनवणं

भारतीयांच्या आहारात काय जास्त आहे?

कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त आहे.

जास्त कार्बोहायड्रेटमुळे कोणते धोके वाढतात?

डायबिटीज, लठ्ठपणा आणि पोटाची चरबी वाढते.

ICMR च्या अभ्यासात किती राज्यांचा समावेश होता?

३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होता.

आहारात काय कमी करावे?

कार्बोहायड्रेट आणि सॅचुरेटेड फॅट कमी करावे.

बचावासाठी काय उपाय करावे?

प्रोटीनयुक्त आहार आणि नियमित व्यायाम करावा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

SCROLL FOR NEXT