Mop Cleaning SAAM TV
लाईफस्टाईल

Mop Cleaning : पावसाळ्यात घराची स्वच्छता करताना काळाकुट्ट झालेला मॉप मिनिटांत लागेल चमकू , वापरा 'ही 'सोपी ट्रिक

Cleaning Tips : पावसाळ्यात घराची स्वच्छता करण्यासाठी मदत करणाऱ्या मॉपची स्वच्छता करणे देखील तितकेच गरजेचे आहे. नाहीतर जीवाणूंचा धोका वाढतो. त्यामुळे घरगुती सोप्या ट्रिकचा वापर करून काळाकुट्ट झालेला मॉप स्वच्छ करा.

Shreya Maskar

घरात फरशी चमकदार मॉप स्वच्छतेसाठी खूप फायदेशीर असतो. मात्र वेळच्यावेळी मॉपची देखील स्वच्छता करणे गरजेचे आहे. घाण मॉप जास्त वेळ घरी ठेवल्यास दुर्गंधी आणि संसर्गचा धोका वाढतो. ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. घराच्या स्वच्छतेनंतर नियमित मॉपच्या कापडाची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे.

व्हिनेगर-बेकिंग सोड्याचा वापर

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मळकट डाग दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. जर तुमचा मॉप घराची स्वच्छता करून काळाकुट्ट आणि चिकट झाला असेल तर व्हिनेगर आणि बेकिंग सोड्यामुळे त्याची चमक परत येऊ शकते. एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला. या पाण्यात १ तास मळकट मॉप भिजवून ठेवा. त्यानंतर लिक्विड सोपचा वापर करून थंड पाण्याने मॉप स्वच्छ करून घ्या. तसेच यामुळे मॉपचा मळकटपणा आणि दुर्गंधी दूर होईल.

ब्लीचिंग पावडर

घराची स्वच्छता करताना मॉपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे यामध्ये धोकादायक बॅक्टेरिया निमार्ण होतात. या धोकादायक बॅक्टेरियांना ब्लीचिंग पावडरच्या साहाय्याने नष्ट केले जाऊ शकते. एका बादलीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात ब्लीचिंग पावडर मिसळा आणि मॉप ३० मिनिटे त्यात ठेवा. यामुळे सर्व जंतू निघून जातील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने मॉप चांगले धुवून घ्या.

मॉपच्या कपड्याची काळजी कशी घ्यावी?

  • घराची स्वच्छता झाल्यावर मॉपचा कपडा व्यवस्थित ठेवून द्या. घाण कपडा असाच ठेवल्यास घातक जीवाणूंचा संसर्ग वाढतो.

  • पावसाळ्यात स्वच्छ केलेला मॉप सुकवताना विशेष काळजी घ्यावी. मॉप कोरड्या ठिकाणी वाळत घाला. कारण दमट हवामानामुळे मॉपला दुर्गंधी येऊ शकते.

  • एक ते दोन महिन्यांनी मॉपचा कापडा बदलणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT