Diet Chiwda  Saam TV
लाईफस्टाईल

Diet Chiwda : एक थेंबही तेलाचा वापर न करता घरच्याघरी बनवा डाएट चिवडा; वाचा सिंपल रेसिपी

Diet Chiwda Recipe : सिंपल आणि फक्त 4 गोष्टी वापरून डाएट चिवडा कसा बनवायचा याची माहिती सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी विविध पदार्थ बनवले जातात. गोड, तिखट फराळाचा बेत प्रत्येकाच्या घरी असतो. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यात लठ्ठ व्यक्तींना असे पदार्थ खाल्ल्याने वजन आणखी वाढते. मात्र दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही डाएट करू शकता. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला सिंपल आणि फक्त 4 गोष्टी वापरून डाएट चिवडा कसा बनवायचा याची माहिती सांगणार आहोत.

साहित्य

पोहे - अर्धा किलो

हिरवी मिरची - बारीक चिरलेली

शेंगदाणे - पाव किलो

बारीक शेव - पाव किलो

कृती

सर्वात आधी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे गॅसवर मंद आंचेवर भाजून घ्या. त्यासाठी तुम्हाला वेगळे पोहे घेण्याची गरज नाही. तुम्ही आपण घरी ज्या पोह्यांचे कांदे पोहे बनवतो ते पोहे घेऊ शकता. पोहे गॅसवर मस्त भाजून घेतले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये मीठ घ्या. मीठ पूर्ण गरम करून घ्या. त्यानंतर यात शेंगदाणे टाका आणि शेंगदाणे देखील मस्त भाजून घ्या. शेंगदाण्याची साल थोडे निघेल अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत.

शेंगदाणे छान भाजून झाले की ते देखील एका प्लेटमध्ये काढून घ्या. तसेच यातील सर्व मीठ एका चाळणीने चाळून घ्या. मीठ चाळून घेतले की शेंगदाणे वेगळे करून घ्या. तसेच पुढे कढईमध्ये मिरची भाजून घ्या. मिरची अगदी 2 ते 3 मिनिटेच भाजायची आहे. पुढे हे सर्व मिश्रण एकत्र करून घा. तसेच शेवटी यामध्ये बारीक पिवळी शेव मिक्स करा. अशा पद्धतीने तयार झाला डाएट चिवडा.

डाएट चिवडा लहान मुलांपासून मोठ्यांना सुद्धा फार आवडतो. ज्या व्यक्ती वजन कमी करत आहेत, तसेच त्यांना बीपी आणि डायबेटिज आहे त्यांनी घरच्याघरी हा चिवडा बनवावा. अशा पद्धतीने बनवलेला चिवडा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

डाएट चिवडा बनवताना तुम्ही यात अन्य काही गोष्टी देखील भाजून मिक्स करू शकता. यामध्ये काजू आणि बदाम सुद्धा मिठामध्ये भाजून घेऊ शकता. अशा पद्धतीने मिठात भाजलेले शेंगदाणे, काजू आणि बदाम फार चविष्ट लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT