Siddhi Hande
दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सगळीकडे फराळ बनवला जात आहे.
पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे घ्या. ते सर्वप्रथम चाळून घ्या. त्यानंतर ते पोहे मंद आचेवर भाजून घ्या.
यानंतर दुसऱ्या ताटात शेंगदाणे, कच्ची चण्याची डाळ, खोबऱ्याचे काप, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घ्या.
त्यानंतर हे सर्व तेलात तळून घ्या. हे सर्व पदार्थ जळू नये याची काळजी घ्या.
त्यानंतर चिवड्याचा मसाला बनवण्यासाठी धने पावडर, आमसूल पावडर, बडीशेप, जिरे पावडर, तिखट, हळद घ्या.
या सर्व मसाल्यात थोडी पीठीसाखर आणि चवीनुसार मीठ टाका.
त्यानंतर हे सर्व मसाले आणि तळलेले शेंगदाणे, कढीपत्ता सर्व पोह्यांवर एकत्रिपतणे टाका.
त्यानंतर हे सर्व पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करुन घ्या.त्यानंतर तुम्ही यात आवडीनुसार शेव टाकून खाऊ शकता.