colorectal cancer diet google
लाईफस्टाईल

Colorectal Cancer Diet: खाण्यापिण्याच्या बदलामुळे होऊ शकतो 'आतड्याचा कॅन्सर', आत्ताच 'हे' पदार्थ खाणं सोडा

Healthy Diet: चुकीचा आहार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आणि लाल मांस यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो. योग्य आहार आणि जीवनशैली बदल करून हा धोका कमी करता येतो.

Sakshi Sunil Jadhav

जसा ऋतू बदलतो तसा आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थांचाही बदल होतो. पण लाइफस्टाइलमुळे पुर्वीसारखं पोष्टीक खाणं आता लोक खात नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण तुम्ही जितकं हेल्दी खाता तितकंच निरोगी आयुष्य जगता. अन्यथा तुम्हाला जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यातला एक आजार म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सर (colorectal cancer).

जेव्हा तुम्ही योग्य पौष्टीक आहार घेत नाही तेव्हा तुम्हाला कोलोरेक्टल कॅन्सरला सामोरं जावं लागतं. हा आजार मोठ्या आतड्यांमध्ये होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2022 मधल्या आकडेवारीनुसार दरवर्षी जवळपास 19 लाख लोकांना कोलोरेक्टल कॅन्सरचा सामना करावा लागतो. पण दैनंदिन आहार हा या आजारापासून बचावासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं लंडनमधील कॉर्नवॉल हॉस्पिटलचे डॉ. अँडी गया यांनी सांगितलं आहे.

जे पदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड असतात. जे हल्ली बाजारात सहज मिळतात. याला रेडी टू इट फूड सुद्धा म्हणतात. अशा पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचं सगळ्यात जास्त प्रमाण असतं. तर फायबरचं प्रमाण कमी असतं. सतत अशा अन्नाचं सेवन केल्याने फॅट वाढतो आणि लठ्ठपणाचाही वाढतो. याचा संबंध विविध प्रकारच्या कॅन्सरशी केला जातो. विशेषतः कोलोरेक्टल कॅन्सरचा यामध्ये समावेश होतो. याशिवाय, या अन्नामध्ये वापरलं जाणारं प्रिझर्व्हेटिव्ह, अ‍ॅडिटीव्ह यामध्ये कॅन्सरचे घटक असतात असं अनेक संशोधनामध्ये दिसून आलं आहे.

तुम्हाला या आजारापासून लांब राहायचं असले तर आहारात लाल मांसाचा समावेश करणं टाळा. डुकराचे किंवा मेंढीचे मांस खाल्ल्याने कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका 10 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतो, असं विविध अभ्यासांतून समोर आले आहे. तसेच प्रोसेस्ड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट, मीठाचं प्रमाण जास्त असतं. स्वयंपाक करतानाही त्यामध्ये नायट्रेट्स आणि नायट्राइट्ससारखी रसायने तयार होतात, जी कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. याच्या तुलनेत हॅलूमीसारखे चीज तुलनेनं सुरक्षित पर्याय ठरू शकतं. तर गोड दही टाळा. फळांचा आहार घ्या साधा वरण भातही पौष्टीक असतो हे लक्षात घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे "ऑपरेशन लोटस" 2.0, झेडपी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार

Gajra Hairstyles: मराठमोळा नखरा अन् केसांत माळा मोगऱ्याचा गजरा, या आहेत 5 सुंदर हेअरस्टाईल्स

Immunity Boost: आहारात या 3 पदार्थांचा करा समावेश, रोगप्रतिकारक शक्ती अन् Metabolism वाढेल; डॉक्टरांनी दिला सल्ला

Raj Thackeray: ही नवीन प्रथा कुठून आली? प्रचारासंदर्भातील आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले

Nandurbar : नवऱ्याचं दुसरीसोबत अनैतिक संबंध, बायकोला कळाल्याने अमानुष मारहाण; महिलेनं संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT