जून महिन्यापासून मुलांच्या शाळेला सुरुवात होणार आहे. शाळेची उत्सुकता मुलांमध्ये असते मात्र पालकांनी यावेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी शरीराची रोगप्रतिकारक स्वादुपिंडामधील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करते तेव्हा टाईप १ मधुमेह होण्याचा धोका असते. यासाठी ब्लड शुगर लेवलची तपासणी करणं गरजेचं असतं.
टाईप १ मधुमेह हा लहान मुलांमध्ये दिसून येतो. यामध्ये योग्य ती काळजी घेतल्यास मूल निरोगी आयुष्य जगू शकतं. अशातच शाळा सुरु होत असताना पालकांनी मुलांची नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.
मुंबईतील एस.एल. रहेजा हॉस्पिटलच्या डायबेटोलॉजिस्ट डॉ. सोनाली पतंगे म्हणाल्या, “टाइप १ डायबेटिस असलेल्या मुलाच्या दररोजच्या नियमित वेळापत्रक आणि शारीरिक व्यायाम या गोष्टींचा समावेश करावा. आहार तसंच व्यायाम यांसारख्या गोष्टी मुलांना करण्यास सांगितल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवरील नियंत्रणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलांमधील इन्सुलिन संवेदनशीलताही वाढू शकते. डायबेटीजचं मॅनेजमेंट अधिक चांगलं करण्यासाठी योग्य त्या उपाययोजनांचा वापर करावा.”
यामध्ये पालकांनी दिवसा आण रात्र ग्लुकोजची पातळी मोजणाऱ्या कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) उपकरणांचा वापर केला पाहिजे. जेवण, शारीरिक व्यायाम आणि इन्सुलिनचे डोस यांसारख्या घटकांना ब्लड शुगर लेव्हल्स कशाप्रकारे प्रतिसाद देतात, याबद्दलचा डेटा ही उपकरणं तत्क्षणी पुरवतात. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचा फायदा म्हणजे पालकांच्या मनावरील ताण हलका होण्यास मदत होते.
अॅबॉटच्या डायबेटिस विभागाच्या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. केनेथ ली यांनी सांगितलं की,, “डायबेटिसचं मॅनेजमेंट लहान मुलासाठी कठीण असते. अशावेळी मुलांची काळजी घेण्यामध्ये पालक महत्त्वाची भूमिका असते. यासाठी कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणांसारख्या तंत्रज्ञानाचे प्रचंड फायदे आहेत. पूर्वीच्या सीजीएम दिसू न शकणाऱ्या तंत्रज्ञानांमध्ये केवळ आधीची आकडेवारी पुरवली जायची, याउलट प्रगत सीजीएम उपकरणं रिअल-टाइम अर्थात प्रत्येक क्षणाची, कृतीमध्ये उतरविण्याजोगी सखोल माहिती पुरवतात. ज्यामुळे मुलांच्या ब्लड ग्लुकोजच्या पातळीमध्ये होणाऱ्या चढउतारांना तत्काळ प्रतिसाद देणं पालकांना शक्य होतं.
पालकांची काळजी कमी होण्यास आणि आपल्या पाल्याच्या डायबेटिसच्या मॅनेजमेंटमध्ये मदत व्हावी यासाठी आवर्जून माहित असाव्यात अशा गोष्टी पुढीलप्रमाणे-
शाळा सुरु होणार असून पालकांनी मुलांची शाळेत जाण्यापूर्वी ब्लड शुगर तपासली पाहिजे. असं केल्याने इन्सुलिनच्या पुढच्या डोसची मात्रा निश्चित करण्य्यात मदत होते. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगच्या मदतीने पालकांना हे सहज करता येऊ शकतं. मुलांची ग्लुकोज पातळी टार्गेट रेंजमध्ये (७०-१८० mg/dL) राहील याची खात्री करता येते. यामुळे ताणतणाव, आहार किंवा व्यायाम यांमुळे पातळीत कशाप्रकारे चढउतार होतात यावर लक्ष ठेवता येतं.
आपल्या मुलांना एक्टिव्ह ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मजा वाटेल अशा पद्धतीने व्यायाम करून घ्या. यामध्ये सायकल चालवणे, जान्स, क्रिकेट किंवा खोखो वा कबड्डीसारखे खेळ खेळण्यास सांगा. त्याचप्रमाणे मुलांना पुरेशी झोप मिळेल याचीही काळजी घ्यावी.
अभ्यास आणि सामाजिक दडपणं ही शालेय जीवनाचा भाग असतात. याचा रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. आपल्या पाल्याला तणावाची लक्षणं ओळखायला आणि गरज असेल तेव्हा विश्रांती घ्यायला शिकवा. स्वत:ची काळजी घेणं हे डायबेटिसच्या एकूणच व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं.
शाळेतील डबा खाण्याची वेळ आणि वेळापत्रकांतील अनपेक्षित बदल यामुळे आहाराचं मॅनेजमेंट आव्हानात्मक ठरू शकतं. मुलाला संतुलित आहार कोणता हे ओळखायला त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा त्यांच्या ग्लुकोजवर कसा परिणाम होतो हे ओळखायला शिकण्यास मदत केली पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.