Diabetes Symptoms, blood sugar saam tv
लाईफस्टाईल

शरीरात Blood Sugar वाढल्यावर दिसतात ही ५ लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष; अन्यथा...

Diabetes Symptoms : मधुमेह हा गुंतागुंतीचा आजार आहे. हा आजार चयापचयाशी संबंधित समस्यांनी होतो. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. तसेच हा आजार शरीराच्या इतर अवयवांना प्रभावित करतो. त्यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

Sign Of Diabetes :

मधुमेहाच्या आजाराने हल्ली प्रत्येक वयोगटातील व्यक्ती त्रस्त आहे. या आजारावर मात करणे अशक्य आहे. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मधुमेह (Diabetes) हा गुंतागुंतीचा आजार आहे. हा आजार चयापचयाशी संबंधित समस्यांनी होतो. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. तसेच हा आजार शरीराच्या इतर अवयवांना प्रभावित करतो. त्यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. शरीरात साखरेची (Sugar) पातळी वाढल्यावर कोणती लक्षणे (Symptoms) दिसतात जाणून घेऊया.

1.किडनीवर परिणाम

मधुमेहाच्या समस्यांमध्ये किडनीच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे त्या खराब होऊ लागतात. सतत लघवी होणे, भूक न लागणे, हात-पाय आणि डोळ्यांना सूज येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच शरीर योग्यरित्या फिल्टरिंग होत नाही.

2. डोळ्यांशी संबंधित समस्या

रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा रेटिनाच्या रक्तवाहिन्यांवरही परिणाम होऊ लागतो. डायबेटिक रेटिनोपॅथीचा आजार बळावतो. यामध्ये डोळ्यांशी संबधित आजार होतात. धुसर दिसणे, दृष्टी कमी होणे यांसारख्या समस्या येतात.

3. हृदयाशी संबंधित आजार

शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा हृदयाशी संबंधित काही समस्या देखील दिसून येतात. यामध्ये डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे, काम न करता थकवा येणे, हृदयाचे ठोके अचानक वाढणे, हात-पायांवर सूज येणे अशा अनेक शारीरिक समस्या येतात.

4. पायात दिसतात या समस्या

रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे पोटदुखी, शरीरात सुन्नपणा, तीव्र वेदना आणि पायाला जखम झाल्यास लवकर बरी न होणे. पायांच्या मज्जातंतूंचे नुकसान होणे यांसारख्या समस्या दिसतात. यासाठी वेळीच सावध व्हायला हवे.

5. त्वचेचा विकार

रक्तातील साखर जेव्हा वाढते तेव्हा काही समस्या केवळ शरीरावरच नव्हे तर त्वचेवरही दिसू लागतात. यामध्ये त्वचा कोरडी पडते, बुरशीजन्य संसर्ग, खाज सुटणे आणि त्वचेच्या संबंधित असामान्य समस्या अचानक वाढू लागतात. तसेच मधुमेहामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT