Diabetes Health, Diabetes Symptoms Saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Health : मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी बहुगुणी, या २ पद्धतीने करा सेवन, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

Diabetes Symptoms : सध्या देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. हल्ली प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या आजाराला बळी पडत आहे. मधुमेह वाढला की, इतर अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Cucumber Benefits :

सध्या देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. हल्ली प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या आजाराला बळी पडत आहे. मधुमेह वाढला की, इतर अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

मधुमेह (Diabetes) नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असायला हवी. साखर (Sugar) नियंत्रणात ठेवण्यासोबतच आहाराची देखील विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही योग्य वेळी त्यावर नियंत्रण ठेवू शकला नाही तर तुमचे आरोग्य (Health) बिघडू शकते.

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात गोडाचे पदार्थ कमी करा, पुरेशी झोप घ्या, मानसिक तणाव आणि जंक फूडचे सेवन कमी करा. उन्हाळा सुरु झाला असून मधुमेहाच्या रुग्णांनी काकडीचे सेवन केल्यास फायदा होईल. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडीत असलेले फायबर तुमची चयापचय मजबूत ठेवण्यास मदत करते. जाणून घेऊया काकडी खाण्याची योग्य पद्धत

1. काकडीचे सूप

काकडीच्या सूपचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. सर्व प्रथम काकडी बारीक कापून घ्या, त्यात ३ चमचे लिंबाचा रस घाला. मिक्सरच्या भांड्यात छोटा कांदा, लसूण, लवंग, ऑलिव्ह ऑइल, धणे, जिरे, मीठ काळी मिरी पावडर आणि चिरलेली काकडी घाला. तयार पेस्ट भांड्यात काढून घ्या. गॅसवर एका भांड्यात लसूण, मिरची, पाणी आणि तयार पेस्ट घाला. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. सूप तयार आहे, याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो तसेच वजनही नियंत्रणात राहाते.

2. काकडीची कोशिंबीर

काकडीचे सूप आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीच्या सॅलडचा समावेश करु शकता. तुम्ही याचे रोज सेवन करु शकता. कोशिंबीरमध्ये जीवनसत्त्व, प्रथिनांशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT