How To Control Blood Sugar, Diabetes  Saam tv
लाईफस्टाईल

मधुमेहींनो, स्वयंपाकघरातील हा मसाला Blood Sugar वर रामबाण; रिकाम्या पोटी प्यायल्याने मिळेल आराम

कोमल दामुद्रे

Diabetes Health Tips :

मधुमेहांनो हल्ली अनेकजण ग्रस्त आहेत. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. अहवलानुसार भारतात १० पैकी ४ लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.

मधुमेह (Diabetes) हा गुंतागुंतीचा आजार आहे. हा आजार चयापचयाशी संबंधित समस्यांनी होतो. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. तसेच हा आजार शरीराच्या इतर अवयवांना प्रभावित करतो. जर तुम्हालाही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर स्वयंपाकघरातील (kitchen) हा मसाला रामबाण ठरेल. मेथी दाण्याचे सेवन करुन तुम्ही रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रित करु शकता. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा.

1. मेथी दाण्याचे फायदे

मेथी दाण्यात अधिक प्रमाणात फायबर असते. जे शरीरातील कार्बोहायड्रेट्स शोषून साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच मेथीमुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करावे. मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने टाईप-२ मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.

2. या समस्यांवर ठरेल प्रभावी

मेथी दाण्याचे सेवन केल्याने चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. मेथी पाणी प्यायल्याने अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. अल्सरची समस्या असल्यास मेथीमुळे पोटातील अल्सरपासूनही आराम मिळेल.

3. मेथी दाण्याचे पाणी कसे प्याल?

मेथी दाण्याचे पाणी रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने आराम मिळतो. तसेच मेथी चावून खाल्ल्याने वजन कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT