Diabetes Health Saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Health : या कारणांमुळे तरुणांमध्ये वाढतोय मधुमेह, जीवनशैलीत आजपासून हे बदल कराच!

Diabetes Causes : खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, गोडाचे प्रमाण, सततचा ताण यामुळे मधुमेहाचा आजार जडतो.

कोमल दामुद्रे

Diabetes Symptoms :

भारतात अनेक वयोगटातील ९० टक्के लोक आजही मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यात प्रामुख्याने लहान मुलांचा देखील समावेश आढळून आला आहे. मधुमेहाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, गोडाचे प्रमाण, सततचा ताण यामुळे मधुमेहाचा आजार जडतो.

संशोधनानुसार, खाण्यापिण्यातील बदलामुळे सध्याच्या तरुण पिढीमध्ये मधुमेह वाढतो आहे. अनेकदा कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता, दुपारे जेवण किंवा रात्री वेळेवर न झोपणे यांसारख्या समस्येमुळे देखील मधुमेहाचा आजार होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवसभर उपाशी राहिल्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळत नाही. रक्तातील साखरेची पातळी खालावते. तसेच बॉडीला व्यवस्थित रित्या डिटॉक्स करता येत नाही. दुपारच्या वेळी अचानक भरमसाठ खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त ग्लुकोज आणि चरबी जमा होते. शारीरिक हालचालीच्या अभावामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहात रुपातंर करते.

यामुळे भारतात सध्या लठ्ठपणा (Obesity) आणि मधुमेहाचा आजार अधिक प्रमाणात वाढत आहे. ही समस्या टाळण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करायला हवे हे जाणून घेऊया.

1. जीवनशैली कशी बदलावी?

  • वजन वाढू देऊ नका

  • धूम्रपान सोडा

  • वेळेवर झोपा (Sleep)

  • 8 तासांची झोप घ्या

  • तुमची बीपी-शुगर तपासा

  • व्यायाम करा

  • ध्यान करा

2. लठ्ठपणाचे कारण

  • खराब जीवनशैली

  • फास्ट फूड

  • कार्बोनेटेड पेये

  • मानसिक ताण (Stress)

  • व्यायाम न करणे

  • औषधांचे दुष्परिणाम

  • झोप न लागणे

3. मधुमेह नियंत्रण करण्यासाठी

  • तुमचे वेळापत्रक बनवा

  • झोपण्याची वेळ निश्चित करा

  • दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्या.

  • आहाराचा दिनक्रम ठरवा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार? CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Diabetic Retinopathy: तरुणांसाठी पुढील ३ ते ५ वर्षे धोक्याची; डायबेटीज वाढणार , नेत्रतज्ज्ञांचा गंभीर इशारा

Health Tips: माशासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update: असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

SCROLL FOR NEXT