Diabetes Health In Monsoon Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Health In Monsoon: मधुमेहाला सांभाळत असा घ्या पावसाचा आनंद; आरोग्याची काळजी घेताना या सूचनाचे पालन कराच!

Diabetes Health : रक्तातील साखरेची पातळी वाढू नये यासाठी आहारात व खाण्यापिण्यात बदल करावा.

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar In Monsoon Season : पावसाळा म्हटलं की, फक्कड चहा, गरमागरम भजी आणि या अल्हादायक ऋतूचा आनंद घेणे. पावसाळा आणि आजार यांच काही सूत जुळलं आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

या काळात जितके अनेक आजार डोके वर काढतात त्यातील एक आजार मधुमेह. या आजारात रुग्णांनी आपली विशेष काळजी घ्यावी. तसेच रक्तातील साखरेची पातळी वाढू नये यासाठी आहारात व खाण्यापिण्यात बदल करावा. टाइम इन रेंज सारख्या मशिनचा वापर करुन आपल्या शरीरात ग्लुकोजची पातळी दिवसभरात किती आहे हे तपासता येते. ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

मुंबई येथील डॉ. अल्पना सोवानीज डायबेटीस केअर क्लिनिकच्या मधुमेहतज्ज्ञ डॉ. अल्पना सोवानी सांगतात, मधुमेहासह (Diabetes) जगणाऱ्या व्यक्तींसाठी पावसाळा हा फ्लू तसेच विविध आजारांच्या संसर्गाचे संकेत घेऊन येतो. या आजारांमुळे त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि त्यातून आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात.

यातून हा काळ त्यांच्यासाठी विशेष आव्हानात्मक बनून जातो. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या काळात आरोग्याच्या समस्या व ग्लुकोजच्या पातळीमधील चढउतार टाळत निरोगी राहण्यासाठी विशेष काळजी (Care) घ्यायला हवी आणि प्रतिबंधात्मक पावले उचलायला हवीत. म्हणूनच पावसाळ्यामध्ये सततची देखरेख अत्यंत महत्त्वाची ठरते व कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) सारख्या उपाययोजनांद्वारे याला मदत मिळू शकते.

पावसाचा आनंद लुटण्यासाठी मधुमेहींनो अशी घ्या काळजी

1. रक्तातील साखरेच्या पातळीवर नियमितपणे देखरेख ठेवा :

या ऋतूमध्ये तुमच्या व्यायामाच्या नियमित वेळापत्रकामध्ये आणि आहारामध्ये (Food) बदल होऊ शकतात, अशावेळी ग्लुकोजची पातळी वारंवार तपासणे हे अत्यावश्यक ठरते. FreeStyle Libre सारखे वेअरेबल CGM उपकरण तुम्हाला तुमच्या ग्लुकोजच्या पातळीची आकडेवारी सांगू शकते. प्रत्येक दिवसाच्या २४ तासांतील किमान १७ तासांसाठी तुमच्या ग्लुकोजची इष्टतम पातळी (सर्वसाधारणपणे ७०-१८० mg/dl) राखण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवा. ऊन असो वा पाऊस, तुम्हाला तुमच्या मधुमेहाचे कधीही व्यवस्थापन करता येईल.

2. आपल्या आहारात रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश करा:

मधुमेहामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशावेळी कितीही स्ट्रीट फूड खाण्याचा मोह झाला तरीही बाहेरचे पदार्थ खायचे टाळायला हवे. घरी बनवलेले पदार्थ व रोगप्रतिकारशक्ती वाढवतील अशा पदार्थांचे सेवन करा. कच्चे पदार्थ खाणे टाळा. यामुळे या काळात रोगसंसर्गाचा धोका कमी होईल. त्याबरोबरच पालेभाज्या शिजवण्यापूर्वी न विसरता स्वच्छ धुवून घ्या, कारण त्यात कीड किंवा बॅक्टेरिया असू शकतात.

3. आपले पाय कोरडे ठेवा:

मधुमेहग्रस्त व्यक्तींनी या ऋतूमध्ये आपल्या पायांची अधिकच काळजी घ्यायला हवी. पावसामध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर आणि पर्यायाने रोगजंतूंच्या संसर्गात आल्यानंतर पाय स्वच्छ धुणे ही महत्त्वाची बाब आहे. बुरशीजन्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी वापरायला सोयीचे बूट घाला आणि ते कोरडे व स्वच्छ ठेवा.

4. व्यायाम करा:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला घरात बसून आराम करण्याची इच्छा होते. पण मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सक्रिय राहायला हवे आणि व्यायामाचे वेळापत्रक नियमितपणे पाळायला हवे. पावसामुळे घराबाहेरच्या व्यायामाचे काही पर्याय कदाचित उपलब्ध होणार नाहीत, पण तुम्ही घरच्या घरी काही कमी श्रम लागणारे व्यायाम करू शकता. अर्ध्या तासाचा व्यायाम किंवा रोज घरातल्या घरात चालणे यामुळेही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.

5. भरपूर पाणी प्या:

पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असते, त्त्यामुळे तुमच्या शरीराला आपोआपच आर्द्रता मिळते. हवेतील दमटपणा आणि उष्णता हे भारतीय मान्सूनचे लक्षण आहे व त्यामुळे तुमच्या शरीरातील आर्द्रतेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवे.

6. आपल्या डोळ्यांना जपा:

हवेतील आर्द्रतेमुळे डोळ्यांना चटकन जंतूसंसर्ग होऊ शकतो. म्हणूनच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या डोळ्यांना हात लावताना काळजी घ्यायला हवी. आपले हात स्वच्छ धुवून नंतरच डोळ्यांना स्पर्श करायला हवा. पावसात भिजणार असाल तर डोळ्यांवर शक्यतो संरक्षक चश्मा घाला. डायबेटिक रेटिनोपॅथीची शक्यता टाळण्यासाठी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.

याखेरीज मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हायपरग्लायसेमियाच्या चिंताजनक स्थितीविषयी सतत काळजी घ्यायला हवी. मान्सूनच्या काळात मधुमेह असलेल्या कोणत्याही व्यक्तीने 'सावध रहा' हा मंत्र सतत ध्यानात ठेवला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT