Diabetes Free Modak Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Free Modak Recipe : मधुमेह असणारे रुग्ण घेऊ शकतात मोदकाचा आस्वाद, जाणून घ्या रेसिपी

कसे बनवाल मोदक ?

कोमल दामुद्रे

Diabetes Free Modak Recipe : गोडाशिवाय सगळे सण हे अपूर्ण आहेत. सणाच्या दिवसात मिठाई बनवली नाही किंवा ती खाल्ली नाही की, चुकल्यासारखे वाटते.

गणेशोत्सवात आपल्याला सर्वत्र मोदक पाहायला मिळतात व खायला देखील मिळतात. या दहा दिवसाचा उत्साह हा ३१ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. गणेश चतुर्थीला प्रसाद म्हणून मोदकांचा नैवेद्य हमखास पानावर वाढला जातो. हा पदार्थ खास गणपतीच्या काळातच सर्वत्र पाहायला मिळते व त्याची चवही चाखायला मिळते.

परंतु, या मोदकाचा आस्वाद मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला घेता येत नाही. त्यासाठी आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा आस्वाद त्यांना देखील घेता येईल.

मिठाईच्या तुलनेत मोदक किती फायदेशीर आहेत

मोदक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे जवळपास सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेले तूप बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करते. नारळ हे आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे तसेच ते पचनक्रियेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे, मोदकामध्ये हेल्दी फॅट्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात.

Benefits Of Modak

यासोबतच तूप हे जीवनसत्त्व (Vitamins) ए आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहे. मोदकामध्ये तांदळाचे पीठ वापरले जाते, तर तांदळाच्या पिठात कॅल्शियमसारख्या अनेक आवश्यक पोषक घटक असतात. यासोबतच यामध्ये कोलीनचे प्रमाण आढळते, जे यकृतामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखते.

हे पाचक, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, यकृत आणि हाडांच्या आरोग्यापर्यंत रक्तातील साखरेची पातळी राखण्यात देखील मदत करते. तसेच यामध्ये असलेले झिंक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

मोदक कशाप्रकारे बनवायचे जाणून घेऊया

साहित्य -

किसलेले खोबरे (Coconut) - १ कप

किसलेला गूळ - १ कप

तांदळाचे पीठ - १ कप

वेलची - ४ ते ५

जायफळ - १

तूप - १/२ वाटी

केशर - २ ते ३ काड्या

काजू - आवश्यकतेनुसार

कृती -

How to Make Modak

१. प्रथम, पॅन मध्यम आचेवर ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात तूप घाला. आता कढईत किसलेले खोबरे ठेवा आणि ५ ते ७ मिनिटे चांगले भाजून घ्या.

२. त्यानंतर त्यात गूळ घाला. गूळ आणि खोबरे ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या. काजूचे लहान तुकडे करा आणि ते पॅनमध्ये ठेवा. नंतर त्यात वेलची आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.

३. गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. सारण तयार होईल.

मोदकाचेवरचे आवरण -

१. मोदकाचे आवरण तयार करण्यासाठी सर्वप्रथम मध्यम आचेवर नॉन-स्टिकी पॅन घ्या.

२. कढईत तांदळाच्या पिठाच्या प्रमाणानुसार पाणी घालावे आणि पाण्यात थोडे तूप घालून चांगले मिक्स करावे. पाण्यात हळूहळू तांदळाचे पीठ घाला आणि सतत ढवळत राहा. त्यात गुठळ्या असू शकतात, त्यामुळे नीट ढवळत राहा. पीठ तयार होईल. नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

तयार करा मोदक -

१. पीठ थंड झाल्यावर हाताने चांगले मिसळा. हाताला चिकटत असेल तर त्यात दोन चमचे तूप टाकून पुन्हा हाताने मळून घ्या.

२. आता साच्याला तूप लावा. नंतर पीठाचा गोळा बनवून तो चपटे करा, आता ते साच्यावर ठेवा आणि त्यात तयार भरलेले मिश्रण घाला.

Modak Recipe

३. मिश्रण घातल्यानंतर साचा बंद करुन त्याला चांगल्याप्रकारे दाब द्या.

४. वाफवण्यापूर्वी सर्व मोदकांना तूप लावा. पाण्याला उकळी आल्यानंतर ते स्टीमरमध्ये ठेवा आणि १० ते १५ मिनिटे वाफ येऊ द्या.

५. जर आपल्याकडे स्टीमर नसेल तर आपण सुती कापडावर देखील हे वाफवू शकतो. तसेच तयार मोदक सर्व्ह करण्यापूर्वी केशराच्या काड्यांनी त्याला सजवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT