Manasvi Choudhary
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना नेते समाधान सरवणकर यांनी लग्नगाठ बांधली आहे.
नुकताच या दोघाचं लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाह संपन्न पार पडला आहे.
तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तेजस्विनी आणि समाधान यांचा लग्नसोहळ्यातील लूक अत्यंत खास आहे. तेजस्विनीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तर समाधानने शेरवानी परिधान केली आहे.
तेजस्वी लोणारी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून तेजस्विनी लोणारीला खूप लोकप्रियता मिळाली.
समाधान सरवणकर यांना मोठा राजकीय वारसा आहे समाधान सरवणकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत.