Diabetes Effect on Eyes Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Effect on Eyes : मधुमेह तुमचे डोळे कमकुवत करतोय ? अशी घ्याल काळजी

मधुमेहाचे, टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रकार आहेत.

कोमल दामुद्रे

Diabetes Effect on Eyes : मधुमेहाची समस्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये 77 दशलक्ष लोक डायबेटिस अर्थात मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेहाचे, टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रकार आहेत.

टाइप-१ या प्रकारात शरीरात इन्सुलीन स्रवत नाही किंवा ते अत्यंत कमी प्रमाणात स्रवते. हे रुग्ण इन्सुलीनच्या इंजेक्शनशिवाय जगू शकत नाही. टाइप-२ या प्रकारात इन्सुलीन कमी प्रमाणात स्रवते, पण या रुग्णांमध्ये गोळ्यांमुळे मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.

मधुमेही आणि वयोवृद्ध व्यक्तींनी नियमितपणे डोळे तपासून घेणे हाच या आजारांचे वेळेवर निदान होण्यासाठीचा आणि आजाराच्या व्यवस्थापनासाठीचा सोपा मार्ग आहे.

डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान झाल्यावर मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याची परिणती नेत्रविकारात होणे टाळण्यासाठी औषधोपचारांचे काटेकोर पालन करणे आणि निरोगी जीवनशैली जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.डोळ्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे आजार टाळण्यासाठी तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता.

1. ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवा

जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, तेव्हा तुमच्या डोळ्यांच्या लेन्सचा आकार बदलू लागतो. ज्यामुळे तुम्ही अस्पष्ट दिसू शकते मात्र, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून तुम्हाला या समस्येवरही मात करता येते. शरीरातील उच्च रक्तातील साखरेची पातळी तुमच्या डोळ्यांच्या रक्तपेशींवर परिणाम करते ब्लड शुगर लेवल वेळोवेळी तपासून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

Diabetes Effect on Eyes

2. शरीराच्या इतर समस्यांकडेही लक्ष द्या

हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दृष्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीत हे महत्वाचे आहे की तुम्ही हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल कट्रोल ठेवले पाहिजे त्यामुळे डोळ्यांच्या समस्याच नाही तर इतर हेल्थ प्रॉब्लेम सुद्धा दूर राहतात.

3. धूम्रपान सोडा

धूम्रपान प्रत्येकाच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. दुसरीकडे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी धूम्रपान हे अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होते.जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्वरित बंद करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे.धूम्रपान केल्याने डायबेटिस रुग्णांच्या नसा, पेशी आणि धमन्यांचे नुकसान होते सोबतच नजर कमजोर होण्याचा समस्या जाणवतात.

4. रोज व्यायाम करा

रोज व्यायाम करणे डोळ्यांसाठी चांगले असते. व्यायामामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. अशा वेळी तुम्ही दरोराज 45 मिनिटे ते 1 तास व्यायाम करा आणि कोणताही नवीन व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांनचा सल्ला आवश्यक घ्या.

5. योग्य आहार घ्या

मधुमेहाच्या रुग्णांनी गोड खाणे टाळावे ,फास्ट फूडपासून दूर राहावे.योग्य आहार घ्यावा तसेच त्यांनी आपल्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे. भूक लागल्यावर फळं खाणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच जेवतानाही थोडी-फार फळं खाणं चांगलं असतं. फळं आणि भाज्यांद्वारे शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळते, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT