Best millets for diabetes and blood sugar control AI Image
लाईफस्टाईल

Diabetes Diet : डायबिटीजवर रामबाण उपाय, भात-पोळीऐवजी खा 'हे' पदार्थ; रक्तातील साखर होईल झटक्यात कमी

Blood Sugar Control Millets Benefits : मधुमेह झाल्यानंतर भात आणि पोळी खाणं बंद करावं का? ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारखी भरड धान्यं रक्तातील साखर नियंत्रणासाठी कशी मदत करू शकतात, वाचा सविस्तर.

Alisha Khedekar

डायबिटीजचं निदान झाल्यानंतर सर्वात आधी आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या जेवणातून भात आणि गहू पूर्णपणे कमी करतात. काहीजण तर भात खाणंच बंद करतात. मात्र, मधुमेह झाल्यानंतर भात आणि पोळी खाणं खरंच बंद करायला हवं का? याचं उत्तर AIIMS दिल्लीच्या एका डॉक्टरांनी दिलं आहे.

डॉक्टरांच्या मते, मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मिलेट्स म्हणजेच भरड धान्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. बाजरी, ज्वारी आणि नाचणी यांसारख्या धान्यांमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे अन्न पचण्याची प्रक्रिया हळू होते. परिणामी, अन्नातील कर्बोदकं हळूहळू शरीरात शोषली जातात आणि रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

मिलेट्सचा वापर रोजच्या जेवणात सहज करता येतो. बाजरी आणि ज्वारीच्या भाकरी खाता येतात. नाचणीच्या पिठापासून भाकरी, धिरडं तयार करता येतो. या धान्यांमधून शरीराला फायबरसोबतच आवश्यक पोषक घटकही मिळतात. मात्र, कोणतं धान्य किती प्रमाणात खायचं, हे व्यक्तीची प्रकृती आणि आहाराच्या गरजेनुसार ठरवणं महत्त्वाचं आहे.

मधुमेह झाला म्हणजे भात आणि गहू खाणं कायमचं बंद करावं, असं नाही. उलट जेवणात कोणता पदार्थ किती प्रमाणात घेतला जातो, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पांढऱ्या भाताचं प्रमाण कमी करून त्याऐवजी काही प्रमाणात भरड धान्यांचा वापर करता येतो. तसेच गव्हाच्या पिठात ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचं पीठ मिसळून पोळ्या तयार करता येतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कोणताही पदार्थ अचानक बंद करण्याऐवजी संतुलित आहारावर भर द्यावा. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या भुम तालुक्यात तब्बल 200 पेक्षा जास्त एकरावरील ऊस जळुन खाक

World's Fastest Spider: माणसापेक्षा वेगाने धावणारा Spider पाहिलाय का?

Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळ सत्तासंघर्षावर जोरदार युक्तीवाद; कोणाच्या बाजुने निकाल लागणार? कोर्टात काय घडलं?

BSNL Recharge Plans : मोठी बातमी! फक्त ₹१७२ मध्ये महिनाभर बिनधास्त कॉलिंग! पाहा कोणता प्लॅन फायदेशीर

Best Time To Bath : सकाळी, दुपारी की रात्री; अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती? ९९% लोकांना पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर

SCROLL FOR NEXT