blood sugar test timing google
लाईफस्टाईल

Blood Sugar Test Timing: ब्लड शुगर चेक करण्याची योग्य वेळ कोणती? झोपेतून उठल्यानंतर की नाश्ता केल्यानंतर?

Diabetes Awareness: डायबेटीस रुग्णांनी ब्लड शुगर कधी तपासावी याबाबत अनेकांना संभ्रम असतो. तज्ज्ञांच्या मते सकाळी उपाशीपोटी तपासणी सर्वात महत्त्वाची असते. नाश्त्यानंतरची तपासणी पोस्टप्रँडियल शुगर मानली जाते.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयीत सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. लोक दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात, त्यामुळे त्यांना बाहेरचं खाणं खावं लागतं. ही आपली गरज असली तरी कालांतराने शरीराला खूप गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. मग जिभेचे चोचले पुरवणं कठीण होऊन बसतं. त्यात जर तुम्हाला ब्लड शुगर किंवा डायबेटीजचा त्रास असेल तर खूप पथ्य पाळावं लागतं. पण या रुग्णांनी औषधासोबत रोजच्यारोज घरी ब्लड शुगर तपासणं गरजेचं असतं. पण याची योग्य वेळ अनेकांना माहित नसते. पुढे आपण तज्ज्ञांनी दिलेली वेळ जाणून घेणार आहोत.

ठाण्यातले KIMS हॉस्पिटलचे डायबेटॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. विजय नेगाळूर यांच्या मते, सकाळी उठल्यावर सकाळच्या नाश्त्याच्या अगोदर तुम्ही ब्लड शुगर तपासू शकता. याने तुम्ही झोपल्यानंतर आणि ८ ते १० तास जेवणात गॅप घेतल्यामुळे शुगर किती वाढते हे आपल्याला कळतं. ग्लुकोजची पातळी किती असते याचा अंदाज लावता येतो. पण त्यासाठी तुम्हाला दोन वेळेस ब्लड शुगर तपासणं गरजेचं आहे. प्रीडायबेटीस किंवा डायबेटीजवर उपचार करण्यासाठी किंवा तुमच्या दैनंदिन सवयीत बदल करण्यासाठी ही टेस्ट महत्वाची मानली जाते.

उपाशी पोटी ब्लड शुगर सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच तपासणं सर्वात महत्वाचं असतं. पण त्यावेळी पाणी आणि काहीही खाणं किंवा पिणं टाळणं गरजेचं असतं. तुम्ही किमान 8 ते 10 तास उपाशी असणं यात गरजेचं असतं. नाश्ता केल्यानंतर 1 ते 2 तासांनी ब्लड शुगर तपासल्यावर ती फास्टिंग शुगर राहत नाही. ती पोस्टप्रँडियल म्हणजे जेवणानंतरची ब्लड शुगर मानली जाते. फास्टिंग शुगर शरीर रात्रीच्या वेळी ग्लुकोज कसं नियंत्रित करतं हे पाहण्यासाठी फायदेशीर ठरते.

काही लोकांना सकाळी काहीही न खाल्ल्यानंतरही ब्लड शुगर जास्त येते. याला डॉन फिनॉमेनन असं म्हणतात. पहाटेच्या वेळी काही हार्मोन्स स्रवतात, त्याने ब्लड शुगर थोडी वाढू शकते. याचा अर्थ नेहमीच डायबेटीस नियंत्रणात नाही असा होत नाही. पण अशी समस्या सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा वेळी औषधं किंवा जेवणाच्या वेळेत बदल करण्याची गरज भासत नसते. तसेच सकाळी उठल्यानंतर लगेचच ही तपासणी केली पाहिजे.

टीप: ही माहिती सार्वजनिक स्त्रोत आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणतीही आरोग्यविषयक सवय किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fake School Scam: राज्यात बोगस शाळा घोटाळा उघडकीस; 'साम'च्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश

Rashmika Mandanna Birthday : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना कितवी शिकलीय?

Baramati Bypoll: सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्यावरून मविआत मतभेद? बारामतीसाठी काँग्रेसनं ठोकला शड्डू

Maharashtra Live News Update : मध्य प्रदेशमध्ये इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

SCROLL FOR NEXT