High Blood Pressure And Diabetes saam tv
लाईफस्टाईल

High blood pressure: मधुमेह आणि हायपरटेन्शन बनतंय साइलेंट किलर, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

Early Signs Of High Blood Pressure And Diabetes: सतत डोकेदुखी, अंधुक दृष्टी, थकवा आणि वारंवार लघवी होणं ही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची लक्षणं असू शकतात. वेळेत तपासणी आणि योग्य जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आज सर्वात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी आहेत. डॉक्टरांच्या मते, हे दोन्ही आजार अनेकदा शरीरावर एकत्र परिणाम करतात आणि त्यांची लक्षणं सुरुवातीला इतकी सौम्य असतात की, लोक तो केवळ सामान्य थकवा किंवा तणाव आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र दिर्घकाळानंतर या समस्यांमुळे हृदय, किडनी, डोळे, मेंदू आणि रक्तवाहिन्यांचे गंभीर नुकसान होऊ शकतं.

भारतात का वाढतेय मधुमेहाची समस्या?

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च-इंडियाबच्या एका अभ्यासानुसार, भारतातील उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचा थेट संबंध लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल आणि चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींशी असल्याचं समजलं. या अभ्यासात असंही उघड झालंय की, शहरं आणि गावं या दोन्ही ठिकाणी बऱ्याच लोकांना या आजारांची माहिती नाहीये.

या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

कोरोना रेमेडीज लिमिटेडचे ​​सहयोगी उपाध्यक्ष आणि वैद्यकीय व्यवहार प्रमुख डॉ. अमित सोनी यांनी सांगितलं की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या एकमेकांशी जोडलेल्या चयापचयाशी संबंधित स्थिती आहेत. सतत डोकेदुखी, अंधुक दृष्टी, असामान्य थकवा, पायांना सूज आणि वारंवार लघवी होणं यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही लक्षणं रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही बिघडत असल्याचं सांगतात.

मधुमेहामुळे धमन्यांचं नुकसान होतं?

डॉक्टरांच्या मते, वारंवार होणारी डोकेदुखी हे उच्च रक्तदाबाचं लक्षण असू शकतं. मधुमेह हा इतर लक्षणांसोबत तुमच्या रक्तवाहिन्यांच्या नुकसानीचा धोका वाढवतं. मधुमेहामुळे धमन्या काही प्रमाणात कडक होतात ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.

पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अंतःस्रावशास्त्र आणि मधुमेह विभागाचे संचालक डॉ. उदय फडके यांनी TOI ला सांगितलं की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार एकाच व्यक्तीमध्ये कोणत्याही मोठ्या लक्षणांशिवाय दिसू शकतात. हे दोन्ही आजार एकत्र आल्यास हृदयविकार, स्ट्रोक, किडनीच्या समस्या आणि दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो.

डोळ्यांच्या नसांवर परिणाम झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?

डॉक्टरांच्या मते, अंधुक दिसणं, डोळ्यासमोर काळे ठिपके दिसणं किंवा अचानक लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणं ही केवळ डोळ्यांची थकव्याची लक्षणं असू शकत नाहीत. हे डायबेटिक रेटिनोपॅथीचे किंवा उच्च रक्तदाबामुळे दृष्टी झालेल्या नुकसानीचं लक्षण असू शकतं.

टीप : ही माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. कुठलाही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT