लाईफस्टाईल

Dhanteras Marathi Wishes: सोन्यासारख्या शुभेच्छा! धनत्रयोदशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास मेसेजेस

Dhanteras Wishes 2025: धनत्रयोदशीच्या मंगलमय दिवशी आपल्या प्रियजनांना सोन्यासारख्या शुभेच्छा पाठवा. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर शेअर करा हे खास संदेश.

Dhanshri Shintre

धनत्रयोदशी म्हणजे संपत्ती आणि आरोग्य दोन्हीची आराधना करण्याचा दिवस. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाले आणि ते वैद्यकशास्त्राचे जनक मानले जातात. या दिवशी आरोग्य व दीर्घायुष्यासाठी त्यांची पूजा केली जाते. तसेच कुबेराचीही पूजा केली जाते. यंदा धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी होणार असून हा दिवस आयुर्वेद दिन म्हणूनही पाळला जातो. धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजनांना द्या या खास शुभेच्छा.

दिवाळीची पहाट,

आली घेऊन धनत्रयोदशी,

घरात नांदो सुख-शांती,

लक्ष्मीचा होवो वास

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!!

धन्वंतरीची कृपा, लाभो तुम्हाला आज,

आरोग्याची संपदा, मिळो नित्य नवा साज.

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!!

धन धान्याची रास, तुमच्या घरी साठो,

प्रत्येक क्षणी आनंद, तुमच्या आयुष्यात नांदो.

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!!

दिव्यांची रोषणाई आयुष्यात येईल लक्ख प्रकाश,

फराळाच्या गोडव्याने कुटुंबात वाढेल प्रेम-गोडवा,

धनत्रयोदशीच्या या शुभदिनी,

आपणास मनःपूर्वक सदिच्छा,

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!!

घरी लक्ष्मीचा वास राहो,

मोठ्या मंडळींची सदैव साथ असो,

ही धनत्रयोदशी आपणांस खास जावो…

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT