Dhanteras 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Dhanteras 2023 : धनत्रयोदशी कधी आहे? खरेदी करण्याचा उत्तम मुहूर्त कधी? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

Dhantrayodashi 2023 Date : यंदा हा सण १० नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळी सण सुरु होतो.

कोमल दामुद्रे

Dhantryodashi Puja Muhurt :

येत्या काही दिवसात दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.

यंदा हा सण १० नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार आणि दैवांचे वैद्य मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला. धनत्रयोदशीपासून दिवाळी सण सुरु होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दिवशी धन्वंतरी, कुबेर देव आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी खरेदीला (Shopping) खूप महत्त्व आहे. या दिवशी सोने, चांदीच्या वस्तू आणि भांडी खरेदी करतात. पूजा मुहूर्त कधी? खरेदीसाठी उत्तम मुहूर्त (Muhurt) कोणता? जाणून घेऊया सविस्तर

1. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त कधी ?

धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्त हा १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता सुरु होईल. ही त्रयोदशी तिथी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१.५७ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार धनत्रयोदशीचा हा सण शुक्रवारी १० नोव्हेंबरला साजरा केला जाईल.

2. धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त

धनत्रयोदशीचा सण दिवाळीपूर्वी (Diwali) साजरा केला जातो. धनत्रयोदशीला गणेश, देवी लक्ष्मी आणि कुबेर पूजा करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाची पूजा केली जाते. तसेच घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावला जातो. धनत्रयोदशीच्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०५. ४७ मिनिटे ते ०७.४७ मिनिटांपर्यंत असेल.

3. धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्याचा उत्तम मुहूर्त

धनत्रयोदशीला भांडी आणि सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. हिंदू पंचागानुसार धनत्रयोदशीला वाहन, घर, गरजेच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. खरेदीसाठी शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबरपर्यंत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT