हिंदू धर्मात दिवाळीचा सण धनत्रयोदशीच्या सणापासून सुरू होतो आणि तो अतिशय शुभ मानला जातो. आज 10 नोव्हेंबर धनत्रयोदशी साजरी होणार. हा सण दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजेच त्रयोदशी तिथीला साजरा केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शतकानुशतके, धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक विशेष वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रामुख्याने सोने, चांदी, गोमती चक्र, पितळेची भांडी, धान्य आणि झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते, परंतु या गोष्टींसोबतच या दिवशी मीठ खरेदीचे विशेष महत्त्व (Importance) आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ (Salt) विकत घेतल्यास लक्ष्मीची कृपा होते आणि तुम्हाला आर्थिक लाभ होतो. एवढेच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाचे अनेक उपाय तुमच्या जीवनात समृद्धी आणण्यास मदत करतात. ज्योतिषी पंडित रमेश भोजराज द्विवेदी यांच्याकडून जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ का खरेदी करावे आणि त्याचे काय फायदे (Benefits) आहेत.
धनत्रयोदशीला मीठ खरेदी करणे शुभ का मानले जाते?
ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की मीठ समुद्रातून येते आणि देवी लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रातून झाली आहे. त्याच वेळी, धनत्रयोदशीचा सण समुद्रातून बाहेर आलेल्या धन्वंतरीजींचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी इतर गोष्टींसोबत मीठ खरेदी करणे खूप शुभ आहे आणि तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकते. यासोबतच या दिवशी कोणालाही मीठ दान करू नका आणि कोणालाही मीठ देऊ नका असा सल्ला दिला जातो.
धनत्रयोदशीला मिठाचे उपाय करून पाहा
धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाचे काही उपाय करून पाहिल्यास तुम्ही नेहमी प्रसन्न राहाल असे मानले जाते. या दिवशी कोणते ज्योतिषीय उपाय करून पाहावेत ते जाणून घेऊया.
धनत्रयोदशीला स्वयंपाकघरात मीठ ठेवा
धनत्रयोदशीच्या दिवशी 5 किलो मीठ विकत घ्या आणि लाल कपड्यात बांधून स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवा जिथे ते कोणाला दिसणार नाही. मीठ त्या ठिकाणी ठेवा आणि वर्षभर असेच ठेवा.
एक वर्षानंतर, पुढील धनत्रयोदशीला हे मीठ घराजवळील नदीत विसर्जीत करा आणि मीठ पुन्हा नव्या वर्षी मीठ त्याच्या जागी बांधून ठेवा. या उपायाने तुमच्या जीवनात सदैव आनंद राहील आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. यासोबतच, जर तुम्ही धनत्रयोदशीला ते खरेदी करत असाल तर दररोज स्वयंपाकघरात वापरा, यामुळे कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाच्या पाण्याने स्नान करावे
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे आरोग्य चांगले नाही आणि त्याचे नेमके कारण माहित नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ मिसळा आणि त्या पाण्याने स्नान करा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी या पाण्याने स्नान करावे. यामुळे तुम्हाला रोगांपासून आराम मिळेल आणि सुख-समृद्धी राहील.
धनत्रयोदशीला मिठाच्या पाण्याने पुसून घ्या
जर तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास असेल आणि तुमचे काम विनाकारण बिघडत असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी मॉपच्या पाण्यात मीठ मिसळा आणि या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ करा. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तुमच्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण भांडणे होत असतील आणि घरात कलह होत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा. यामुळे सर्व दोषांपासून मुक्ती मिळते. अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे अशा समस्या निर्माण होऊ लागतात. मीठ पाण्याने पुसल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.
घराच्या या दिशांना मीठ ठेवा
धनत्रयोदशीच्या दिवशी काचेच्या छोट्या भांड्यात मीठ भरून घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्यास धन आकर्षित होण्यास मदत होते. या उपायाने तुम्हाला पैसा तर मिळेलच पण कर्जापासून मुक्ती मिळेल आणि आर्थिक नुकसानीपासूनही वाचाल. पती-पत्नीमध्ये विनाकारण भांडण होत असेल तर बेडरूममध्ये मीठाची वाटी ठेवा. यामुळे नात्यात गोडवा राहतो आणि भांडणापासून मुक्ती मिळते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.