Dell Technologies ने भारतात आपला AI फीचर लॅपटॉप लॉन्च केला आहे. कंपनीने Latitude आणि Mobile Precision व्यावसायिक PC पोर्टफोलिओ अपग्रेड केला आहे.
कंपनीने असे म्हटले आहे की, त्यांचे नवीन AI लॅपटॉप (Laptop) हे जगातील सर्वात सुरक्षित, इंटेलिजेंट आणि मॅनेज करणारे पीसी असतील. डेल चा हा लॅपटॉप 2-इन-1 आणि डिटेचेबल कीबोर्ड सारख्या वैशिष्ट्यांनी तयार करण्यात आला आहे.
हा लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम तसेच इंटेलच्या नवीन प्रोसेससह वापरकर्त्यांना मिळणार आहे. डेलच्या या नवीन लॅपटॉपमध्ये ७५ टक्के रिसायकल मटेरियल वापरण्यात आले आहे.
1. किंमत (Price)
Dell Latitude सीरिजमध्ये आतापर्यंत ५ लॅपटॉप लॉन्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये 2-इन-1, डिटेचेबल आणि अल्ट्रालाइट मॉडलचा समावेश आहे. तर Mobile Precision सीरीजमध्ये मॉडेलचा समावेश केला गेला आहे. Dell Latitude 9450 2-in-1 ची सुरुवातीची किमत २,६०,६९९ रुपये इतकी आहे. तर Dell Latitude 7450 2-in-1 ची किमत १,५४,९९९ रुपये इतकी आहे.
Dell Latitude 7350 Ultralight ची किमत १,२५,९९९ रुपये इतकी आहे तर Dell Latitude 7350 Detachable ची किमत १,७३,९९९ रुपये आहे. यामध्ये Dell Latitude 5450 ची किमत १,१०,९९९ रुपये आणि Dell Precision 5490 ची किमत २,१९,९९९ रुपये आहे.
2. Latitude 9450 2-in-1 फीचर
AI च्या वैशिष्ट्यासह हा लॅपटॉप CPU, GPU आणि NPU म्हणजेच न्यूरल प्रोसेसिंग युनिटसह येत आहे. याच्या फीचरबद्दल बोलायचे झाले तर यात १४ इंचाची न्फिनिटी एज QHD+ स्क्रीन आहे. हे Intel Core Ultra 5 125U प्रोसेसरवर काम करते. यामध्ये 16GB LPDDR5x रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज आहे.
कंपनीने असे म्हटले की, हा लॅपटॉप जगातील पहिला व्यावसायिक पीसी आहे. जो हॅप्टिक टचपॅड फीचरला सपोर्ट करतो. यात तीन थंडरबोल्ट 4 यूएसबी टाइप सी पोर्ट आणि चार्जिंगसाठी युनिव्हर्सल ऑडिओ जॅक आहे. या लॅपटॉपमध्ये नॅनो सिम कार्ड स्लॉट देखील वापरकर्त्यांना देण्यात आला आहे.
3. Latitude 7350 Detachable फीचर
Latitude 7350 Detachable बद्दल सांगायचे झाले तर हा लॅपटॉप देखील AI फीचरसह बाजारात लॉन्च होत आहे. यामध्ये १४ इंच स्क्रीन आहे. या लॅपटॉपची स्क्रीन वेगळी करता येईल. यात 16GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळत आहे. हा लॅपटॉप Intel Core Ultra 5 प्रोसेसरवर काम करतोय. या लॅपटॉपच्या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात येत आहे. Latitude 7350 Detachable मध्ये Ultralight variant लॉन्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये कीबोर्ड वेगळा करता येत नाही.
4. Precision 5490
Precision 5490 चा AI फीचर असलेला हा लॅपटॉप इंटेल कोअर अल्ट्रा ७ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह 32GB LPDDR5x रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह मिळत आहे. यामध्ये चार थंडरबोल्ट 4 यूएसबी टाइप सी पोर्ट आणि चार्जिंगसाठी युनिव्हर्सल ऑडिओ जॅक आहे. या लॅपटॉपमध्ये मेमरी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.