Kitchen tips, Mango recipe
Kitchen tips, Mango recipe ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

नक्की ट्राय करुन पहा आंब्यापासून ही टेस्टी रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळा म्हटलं की, जीभेची चव ही आंब्यावर येऊन तरळते. आंब्यात अनेक पोषक घटक आहेत. आंब्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हापूस, तोतापुरी, दशेरी, बादामी आदी प्रकार तर आपल्याला माहित आहे. (try this tasty recipe from mango)

हे देखील पहा -

आंब्यापासून (Mango) अनेक चविष्ट रेसिपी बनवल्या जातात. आमरस, मँगो मस्तानी, पन्ह, आंबापोळी आदी पेक्षा जास्त चविष्ट पदार्थ बनवले जातात.आजपर्यंत आपण बेसन घालून दह्याची कढी खाल्ली असेलच पण आज आपण पिकलेल्या आंब्यापासून कढीची चव चाखणार आहोत. ही कढी खायला खूप चविष्ट आणि मसालेदार असते. यात दही किंवा साध्या दुधाचा वापर केला जात नाही. भातासोबत याची चव चांगली लागेल. घरात भाजी नसेल पण आंबे असतील तर ही रेसिपी आपण सहज करु शकतो.

आंबा कढी-

साहित्य-

पिकलेले आंबे - ३

नारळाचे दूध - १/२ कप

आंब्याचा जाडसर रस - १/२ कप

मोहरी - १/२ छोटा चमचा

लाल मिरची - १/२ छोटा चमचा

तेल - १ छोटा चमचा

हळद - १/४ छोटा चमचा

कढीपत्ता - ७ ते ८ पाने

गूळ - २ छोटे चमचे

मीठ - चवीनुसार

आवश्यकतेनुसार पाणी (Water)

कृती -

आंब्याची कढी बनवण्यासाठी नारळाचे दूध (Milk), आंब्याचा जाडसर रस, मिरच्या बारीक करून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल गरम करुन त्यात कढीपत्ता, मोहरी आणि हळद घाला. वाटलेले मिश्रण पॅनमध्ये घेऊन काही मिनिटे शिजवून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घेऊन गूळ मिसळा. याशिवाय करीमध्ये चवीनुसार मीठ घाला. भातासोबत गरमागरम सर्व्ह करा आंबा कढी.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT