Vitamins B6 food, Health issue, Benefits ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Vitamin B6 Food : जीवनसत्त्व ब - ६ च्या कमतरतेमुळे होऊ शकतात अनेक आजार, यावर मात करण्यासाठी हे पदार्थ खाणे सुरु करा

शरीरात जीवनसत्त्व ब - ६ चे प्रमाण वाढवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.

कोमल दामुद्रे

मुंबई : प्रथिने, कॅल्शियम आणि इतर प्रकारच्या जीवनसत्त्वांप्रमाणे, शरीराला चांगल्या कार्यासाठी जीवनसत्त्व ब ६ ची देखील आवश्यकता आहे. शरीरात याच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

हे देखील पहा -

शरीर निरोगी ठेवण्यासाठी व त्याचे कार्य सुरळीत करण्यासाठी आपल्याला सगळ्या जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीरात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जीवनसत्त्व ब-६ शरीरातील प्रथिने, चरबी व कर्बोदकांमध्ये होणारी चयापचय आणि लाल रक्तपेशी व न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे त्वचेवर पुरळ उठणे, ओठ फुटणे, घसा सुजणे, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, थकवा होणे, हात-पाय दुखणे व चक्कर येणे अशा अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जीवनसत्त्व ब-६ ची शरीरात निर्माण होणारी कमतरता कमी करण्यासाठी आपल्याला आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घ्या.

१. गाजरमध्ये जीवनसत्त्व ब - ६ मुबलक प्रमाणात आढळते. यात जीवनसत्त्व क, ए, लोह, फायबर यासह इतर अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. गाजराचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.

२. दूध (Milk) हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत नाही तर जीवनसत्त्व (Vitamins) ब-६ चे अधिक प्रमाणात गुणधर्म यात आहेत. दररोज दुधाचे सेवन केल्याने हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते व पचनाच्या समस्या टाळता येतात.

३. वजन वाढवण्यासाठी केळी फायदेशीर ठरते. केळीत जीवनसत्त्व ब-६ व्यतिरिक्त केळी विविध अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील प्रदान करते.

४. हिरव्या पालेभाज्यामध्ये लोह, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. अशक्तपणा आणि कमकुवत हाडांनी त्रस्त असलेल्यांनी त्यांचा आहारात समावेश करा.

५. जीवनसत्त्व ब - ६ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण चिकन यकृताचे सेवन करायला पाहिजे. जीवनसत्त्व ब-६ व्यतिरिक्त यात फोलेट आणि लोहाचे चांगला स्त्रोत आहे. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT