December Monthly Horoscope 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

December Monthly Horoscope 2023: शेवटच्या महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण! करिअरमध्ये प्रमोशन, लागेल लॉटरी; तुमची रास यात आहे का?

December Horoscope 2023 : डिसेंबर महिन्यात अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात ६ मोठ्या ग्रहांचे देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडणार आहे.

कोमल दामुद्रे

December Monthly Rashi bhavishya :

डिसेंबर महिन्यात अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात ६ मोठ्या ग्रहांचे देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडणार आहे.

या महिन्यात बुध, शुक्र, मंगळ आणि गुरु या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर याचा शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे. या लोकांना करिअर, उत्पन्न संबंधित अधिक चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. येणारा महिना हा अधिक आव्हानात्मक असू शकतो. जाणून घेऊया डिसेंबर महिन्याचे राशीफळ. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मेष

करिअरमध्ये (Career) प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चढ-उतारांनी भरलेला असेल. करिअरसाठी खूप संघर्ष करावा लागेल. कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम कराल.

2. वृषभ

करिअरबाबतीत थोडे चिंतीत राहाल. कार्यक्षेत्रात तुमच्या क्षेत्रानुसार बदल कराल. मानसिकदृष्ट्या (Mental Health) अस्वस्थ राहू शकता. डिप्रेशनवर मात मिळवण्याचा प्रयत्न कराल.

3. मिथुन

कामाच्या ठिकाणी प्रगती दिसेल. डिसेंबरच्या तुमचा प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक खर्च वाढेल. गुंतवणुकीकडे (Investment) लक्ष दिसल्यास बरे होईल.

4. कर्क

खूप मेहनत करुनही अपेक्षित यश मिळवण्याबाबत शंका आहे. करिअरवर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. आपल्या मेहनीत कोणतीही कसरत सोडू नका.

5. सिंह

करिअरच्या बाबतीत हा महिना उत्तम असेल. मेहनतीनुसार यश मिळेल. आर्थिक गुंतवणूकीसाठी हा काळ उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे मत व्यक्त कराल.

6. कन्या

अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. करिअरच्या अनेक समस्यांपासून सुटका होईल. कुटुंबासोबत पार्टीमूडमध्ये असाल. प्रवासातही यश मिळेल. मन प्रसन्न राहील.

7. तुळा

करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. इच्छित करिअर क्षेत्र मिळू शकते. व्यवसायात प्रगती होईल.

8. वृश्चिक

या महिन्यात मेहनतीचे फळ मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. करिअरच्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर या महिन्यात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

9. धनु

आर्थिक समस्यांमुळे या महिन्यात करिअरच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागेल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ-उतारांचा असेल. निर्णय जपून घ्या.

10. मकर

करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल, पण खूप मेहनत करावी लागेल. तुम्हाला तुमचे आवडते कामाचे ठिकाण देखील मिळू शकते.

11. कुंभ

कुंभ राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करतील आणि या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. युवकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

12. मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टीकोनातून काळ अनुकूल राहील आणि आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. या महिन्यात तुम्हाला कोणत्याही नवीन गुंतवणुकीद्वारे विशेष यश मिळू शकते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT