Dark Spots Causes  Saam tv
लाईफस्टाईल

Dark Spots Causes : या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर पडतात काळे डाग, डोळ्याखाली येते काळे वर्तुळ...

Causes Of Dark Spots On The Skin : जाणून घेऊया ब्लॅक स्पॉट्सची योग्य कारणे कोणती आहेत

कोमल दामुद्रे

Skin Care Tips : चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग आपले सौंदर्य अधिक सुंदर करण्याऐवजी ते खराब करतता. यामुळे आपली त्वचा निस्तेज होते. पण तुम्हाला माहीत आहे का ? आपला चेहरा खराब दिसण्यामागे आपल्याच काही सवयी कारणीभूत असतात.

सततच्या प्रदूषणामुळे व अनेक केमिकल्स प्रोडक्टसमुळे चेहरा खराब होतो. चेहरा धुण्यापासून ते तो सुकवण्यापर्यंत अनेक चुकांमुळे तो निस्तेज होऊ लागतो. पण चेहऱ्याची कितीही काळजी घेतली तरी त्यावर येणाऱ्या सुरकुत्या, डाग यामुळे चेहरा अधिक खराब दिसू लागतो. जाणून घेऊया ब्लॅक स्पॉट्सची योग्य कारणे कोणती आहेत ती

1. निरोगी आहार न घेणे

खाण्यापिण्याच्या या सवयीमुळे आपला आहार (Food) बिघडतो. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग व मुरुमे येऊ लागतात. जास्त तळलेले, मसालेदार व जंक फूड खाल्ल्यामुळे आरोग्यासाठी व त्वचेसाठी नुकसान होते. ज्यामुळे त्वचेवर तेलकटपणा येतो. पिंपल्सवर (Pimples) वेळीच उपचार केले नाही तर ते कायमचे तसेच डाग सोडतात. त्यामुळे आपल्याला आहारात हंगामी फळे व भाज्यांचा समावेश करा. पुरेशा प्रमाणात पाणी प्या व आहारात अँटिऑक्सिडंट पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करा.

2. पिंपल्स सतत फोडणे किंवा चेहरा खाजवणे

पिंपल्समुळे आपल्याला चेहऱ्यावर (Skin) सतत खाज येते. ज्यामुळे आपण पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करतो. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग ही पडतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स काढण्यासाठी बहुतेक लोक आपल्या नखांचा किंवा टोकदार वस्तूंचा वापर करतात. असे केल्याने चेहरा खराब होतो. चेहऱ्यासाठी क्लीन्सिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग फॉलो करा. दिवसातून चेहरा दोनवेळा धुवा. याशिवाय चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी चा वापर करा.

3. सूर्याच्या किरणांमुळे

सूर्याचे अतिनिलकिरण चेहऱ्यावर पडल्यामुळे त्वचेचा रंग खराब होतो. त्यामुळे डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर डाग पडू लागतात. आपल्या चेहऱ्यामध्ये मेलॅनिन आढळते. जे यूव्ही किरणांपासून आपले संरक्षण करते, परंतु संरक्षणाशिवाय जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'त्यांना काही काम नसतं, फक्त..' सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर लेक श्रिया काय म्हणाली?

Makyachi Bhakri Recipe : जेवणासाठी खास बनवा मऊ अन् पौष्टिक मक्याची भाकरी, वाचा गावरान रेसिपी

Parenting Tips: मुलांसमोर कधीही करू नका या चुका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: बीडच्या नारायण गड येथील दसरा मेळाव्याचे बॅनर

Actor Death Mystery : कॉल बॉयशी शरीरसंबंध, अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले.. नंतर जमिनीत आढळला अभिनेत्याचा मृतदेह

SCROLL FOR NEXT