sleeping in car danger google
लाईफस्टाईल

Car Safety : कारमध्ये एसी लावून झोपताय? तर तुमचाही होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या कारण

Sleep In Car : कारमध्ये बंद काचा आणि एसी सुरू ठेवून झोपणे जीवघेणे ठरू शकते. तज्ज्ञांचा इशारा आणि नुकत्याच्या घटनांमधून धोक्याची जाणीव करून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बऱ्याच जणांना २४ तास अपुरे वाटायला लागले आहेत. शरीरासाठी आणि मेंदूसाठी आवश्यक असणारी पुरेशी झोप मिळणं सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे काही वाहन चालक त्यापेक्षा कार चालक हे गाड्यांमध्ये झोपणे सोयीचे मानायला लागले आहेत. मात्र AC आणि शांततेसाठी कारमध्येच झोपणे जीवघेणे ठरु शकते.

गाडीत झोपणाऱ्यांच्या काही जीवघेण्या घटना सध्या घडल्या आहेत. त्यामध्ये नोएडामधील सेक्टर-62मध्ये असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बॉयोलाजीच्या रस्त्यावर दोन मृत असवस्थेत माणसं होती. कारमध्ये काचाबंद करुन दोन मित्र झोपले होते. त्यांना काचा तोडून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या मृत्युचं कारण हे त्यांना न मिळालेले ऑक्सिजन आहे. हे दोघेही दारू पिऊन कारमध्ये झोपले होते. पुढे सीएनजी संपल्यावर एसी आपोआप बंद झाला असावा. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दोघांचाही झोपेत गुदमरुन मृत्यू झाला असावा.

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञ म्हणतात, खूप वेळ कारच्या काचा बंद ठेवल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड संपूर्ण शरीरात पसरते. कारमध्ये झोपलेल्या व्यक्तीला याचे भान नसते की, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चाचले आहे. ही प्रक्रिया नकळत होत असते. पुढे याचा शेवट मृत्यू हा असतो.

कोणती खबरदारी घ्याल?

१. कधीही गाडी मोकळ्या जागेत पार्क करुन थांबावे.

२. कारमध्ये एसी सुरु केल्यावर वेळोवेळी ती फ्रेश एयर मोडवर करावी.

३. कारची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहावी.

४. लहान मुलांना कारमध्ये एकटे ठेवू नये.

५.तुम्ही जर गाडीत बसणार असाल तर खिडक्या खुल्या करुन बसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा स्फोट

Online Business Ideas: ५००० रुपयात सुरु करा ऑनलाइन बिझनेस; महिन्याला मिळतील लाखो रुपये

नागपूरमध्ये हलबा समाजाचं आंदोलन हिंसक, जात प्रमाणपत्रासाठी उपोषण, नेमके प्रकरण काय? VIDEO

Saturday Horoscope: मेषला आरोग्याच्या समस्या तर, या ५ राशींना मिळणार यश; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Babies constipation: थंडी वाढली की बाळांना का होतं कॉन्स्टिपेशन? तज्ज्ञांनी सांगितली कारणं आणि सोपे उपाय

SCROLL FOR NEXT