Ayurveda diet rules saam tv
लाईफस्टाईल

Ayurveda diet rules: रोज खाताय हे चुकीचं फूड कॉम्बिनेशन? आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Which Foods Should Not Be Eaten Together: आयुर्वेदानुसार काही फूड कॉम्बिनेशन पचनासाठी हानिकारक ठरू शकतात. दूध आणि मासे, दुधासोबत लिंबूवर्गीय फळे, गरम अन्नात मध यांसारख्या चुकीच्या सवयींमुळे गॅस, आम्लता आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

जेवताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण काय खातो आणि कोणते पदार्थ एकत्रित खातो, याचा थेट आपल्या पचनावर परिणाम होतो. चुकीच्या फूड कॉम्बिनेशमुळे पचन बिघडू शकतं आणि शरीरात टॉक्सिन पदार्थ जमा होऊ शकतात. यामुळे गॅस, पोटफुगी, आम्लता, त्वचेच्या समस्या आणि दीर्घकाळात गंभीर आजार देखील होऊ शकतात. आयुर्वेदानुसार, तुम्हाला सांगतो कोणतं कॉम्बिनेशन टाळलं पाहिजे ते पाहूयात.

आयुर्वेदनुसार काय केलं पाहिजे?

आयुर्वेदाबद्दल माहिती देणाऱ्या केवायुर्वेदा या संस्थेनुसार, प्रत्येक व्यक्तीची वात, पित्त, कफ आणि पचन क्षमता वेगवेगळी असते. काही पदार्थांचे गुणधर्म विरुद्ध असतात. जर वारंवार त्याचं एकत्रितपणे सेवन केलं तर पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव येतो. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ आणि पचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

कोणतं फूड कॉम्बिनेशन बनवू नये?

आयुर्वेदानुसार, दूध आणि मासे हे सर्वात चुकीचं फूड कॉम्बिनेशन असल्याची माहिती आहे. आयुर्वेदानुसार, दूध थंड आणि जड मानलं जातं. तर मासे गरम मानले जातात. या दोन्हींचं एकत्र सेवन केल्याने पचन समस्या आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. संत्री, लिंबू किंवा अननस यांसारखी लिंबूवर्गीय फळं देखील दुधासोबत खाऊ नयेत. कारण ते पोटात दूध दही करू शकतात आणि गॅस आणि आम्लता वाढवू शकतात.

आयुर्वेदातही गरम अन्नात मध मिसळणं हानिकारक मानलं जातं. मध गरम केल्याने त्याचे गुणधर्म बदलू शकतात आणि शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. हेवी जेवणानंतर लगेच फळं खाणं देखील योग्य मानलं जात नाही. कारण फळं लवकर पचतात आणि जड जेवणासोबत पोटात फर्मेंटेशन सुरू होऊ शकतं.

दही आणि साखरेचं मिश्रण देखील पचनासाठी योग्य मानला जात नाही. दही आधीच आंबट आणि थंड असतं. तर रिफाइंड साखर शरीरात असंतुलन वाढवू शकते. रात्री फळांसोबत किंवा थंड पदार्थांसोबत दही खाल्ल्याने कफ वाढू शकतो.

आयुर्वेदानुसार, हंगामी पदार्थांचा आहार समावेश करा. त्याचप्रमाणे आलं, जिरं आणि बडीशेप सारखे मसाले आहारात वापरावेत. ज्यामुळे पचनास मदत होते. योग्य फूड कॉम्बिनेशन अवलंब केल्याने पचन सुधारतं. पोषक तत्वांचं शोषण सुधारतं आणि शरीर निरोगी राहतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra News Live Update: अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने धुळेकर नागरिकांनी सोन चांदी खरेदी करण्याचा लुटला आनंद

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

SCROLL FOR NEXT