Blood Pressure google
लाईफस्टाईल

Blood Pressure : हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? रोज खा हे 1 फळ BP राहील नियंत्रणात

Blood Pressure Control : हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी काही फळं फायदेशीर ठरू शकतात. त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि नायट्रिक ऑक्साइड रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Sakshi Sunil Jadhav

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हाय ब्लड प्रेशरच्या (High Blood Pressure) समस्येला सर्वांनाच सामोरं जावं लागतंय. खाण्या पिण्यात बदल, झोपेच्या वेळेत बदल आणि व्यायाम टाळल्यामुळे भविष्यात जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण याचा परिणाम तुमच्या ह्रदयावरही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

तज्ज्ञांच्या मते, अनेक दिवस ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत नसेल तर हॉर्ट अटॅक, स्ट्रोक, ह्रदय निकामी होणे आणि किडनीचे आजार वाढू शकतात. पण तुम्ही आहारात काही महत्वाचे बदल केले तर तुमचा बीपी हा काहीच दिवसात नियंत्रणात येऊ शकतो.

तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर डाळींब दिवसातून एकदा तरी खाल्लं पाहिजे. त्याने बीपी नियंत्रणात राहतो. डाळींबाचे दाणे किंवा ज्यूस असे दोन्ही पर्याय तुमच्याकडे आहेत. डाळिंबामध्ये 'प्युनिकॅलाजिन्स' (Punicalagins) आणि 'अँथोसायनिन्स' (Anthocyanins) नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरात साठलेल्या घाण कोलेस्ट्रोलचे ऑक्सिडेशन कमी करतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून सूज कमी होते आणि ह्रदयाचे कार्य सुधारतं.

तसेच डाळिंब शरीरातल्या नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण वाढवतं. नायट्रिक ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्या जास्त लवचिक होतात. त्यातले अडथळे कमी होतात.पण डाळिंब सेवन करताना मर्यादा ठेवली पाहिजे. म्हणजेच दिवसातून फक्त १ कपच डाळिंबाचा रस सेवन करू शकतात. तसेच ह्रदय किंवा कोलेस्ट्रॉलटी औषधं घेत असलेल्या व्यक्तींनी रोज डाळिंबाचा रस घेण्याआधी डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेतला पाहिजे. तुमच्या आहारात बाहेरचे जंकफूड, तेलकट पदार्थ नसतील याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मानेवरचे हट्टी काळे डाग जात नाहीत? मग स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टी वापरून घरीच करा उपाय

Maharashtra News Live Update : दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या जोरदार सरी

Children safety: मुलं आई-बाबांपासून लपवतात 'या' गोष्टी, पालकांना माहितीच हव्यात

Beed: पुण्यानंतर बीडमधील परळी हादरले, विषारी दारूमुळे तरुणाचा मृत्यू

पंतप्रधानांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ; थेट इंग्लंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT