पार्लरची गरज नाही! घरच्या घरी मिळवा Korean Glass Skin; फॉलो करा या ७ सोप्या स्किनकेअर टिप्स

Shruti Vilas Kadam

डबल क्लिन्झिंगने करा सुरुवात

सर्वप्रथम ऑइल-बेस्ड क्लिन्झरने मेकअप आणि सनस्क्रीन काढा. त्यानंतर वॉटर-बेस्ड फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल पूर्णपणे निघून जाते.

Korean Skin Care Tips

आठवड्यातून 1-2 वेळा एक्सफोलिएट करा

त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin Cells) दूर करण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सौम्य स्क्रब किंवा केमिकल एक्सफोलिएटर वापरा. त्यामुळे त्वचा अधिक मऊ आणि चमकदार दिसते.

Korean Skincare Routine

त्वचेला हायड्रेट ठेवा

कोरियन स्किनकेअरमध्ये हायड्रेशनला विशेष महत्त्व असते. हायड्रेटिंग टोनर, फेस मिस्ट किंवा एसेन्सचा वापर केल्याने त्वचा तजेलदार राहते.

Korean Glass Skincare

व्हिटॅमिन C किंवा नायसिनामाइड सीरम वापरा

त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी व्हिटॅमिन C किंवा नायसिनामाइड असलेले सीरम फायदेशीर ठरतात.

Korean Glass Skincare

मॉइश्चरायझर लावायला विसरू नका

स्किनकेअर रूटीननंतर त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या त्वचेनुसार योग्य मॉइश्चरायझरचा वापर करा.

Korean Glass Skin

सनस्क्रीन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा

घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हा टप्पा अत्यंत आवश्यक आहे.

KOREAN SKIN CARE | PINTREST

पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या

फक्त स्किनकेअर प्रॉडक्ट्स पुरेसे नसतात. भरपूर पाणी पिणे, फळे-भाज्या खाणे आणि दररोज 7 ते 8 तास झोप घेणे यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि ग्लोइंग राहते.

Korean Glass Skin

Face Icing: चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे, तिसरा फायदा जाणून तुम्हीही व्हाल थक्क

Face Icing | Saam Tv
येथे क्लिक करा