Face Icing: चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे, तिसरा फायदा जाणून तुम्हीही व्हाल थक्क

Shruti Vilas Kadam

त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

Ice Use For Face

सूज आणि पफीनेस कमी होतो

डोळ्यांखालील सूज किंवा सकाळी चेहऱ्यावर आलेला पफीनेस कमी करण्यासाठी बर्फ प्रभावी ठरू शकतो. थंडावा मिळाल्याने त्वचा फ्रेश वाटते.

Ice Benefits On Face

मोठे पोअर्स दिसतात लहान

बर्फामुळे त्वचेवरील पोअर्स काही काळासाठी आकुंचन पावतात. त्यामुळे त्वचा अधिक स्मूथ आणि टवटवीत दिसते.

Ice Benefits On Face

मुरुमांची जळजळ कमी होऊ शकते

पिंपल्समुळे आलेली लालसरपणा, सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी काही वेळ बर्फाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. मात्र थेट बर्फ लावणे टाळावे.

Applying Ice On Face

थेट बर्फ लावू नका

बर्फ कधीही थेट त्वचेवर घासू नये. तो स्वच्छ कापडात किंवा कॉटनच्या रुमालात गुंडाळूनच वापरावा. अन्यथा त्वचेचे नुकसान होऊ शकते.

Applying Ice On Face

संवेदनशील त्वचेने घ्यावी काळजी

ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे किंवा ज्यांना रोझेशिया, एक्झिमा किंवा त्वचेचे इतर त्रास आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बर्फाचा वापर करू नये.

Applying Ice On Face

जास्त वेळ नको

बर्फ 30 सेकंद ते 1 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नये. जास्त वेळ वापरल्यास त्वचा कोरडी पडणे, लाल होणे किंवा इरिटेशन होण्याची शक्यता असते.

Icing on face | Yandex

Job Opportunity: 9 ते 5 नोकरी नको; दारूची चव ओळखण्याचं मिळतं लाखोंचं मानधन, या हटके करिअरबद्दल जाणून घ्या

Job Opportunity | Saam Tv
येथे क्लिक करा