Shruti Vilas Kadam
वाइन टेस्टर (Sommelier) हा वाइनचा सुगंध, चव, रंग, दर्जा आणि गुणवत्ता तपासतो. बाजारात वाइन विक्रीसाठी जाण्यापूर्वी तिची गुणवत्ता योग्य आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी त्याची असते.
वाइन टेस्टिंगसाठी सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि स्पेशलायझेशन कोर्स उपलब्ध आहेत. भारतातील काही संस्था तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही या क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्यांनाही या क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात.
चव आणि सुगंध ओळखण्याची क्षमता, निरीक्षण कौशल्य, उत्तम संवादकौशल्य, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि विविध प्रकारच्या वाइनबाबतची माहिती असणे महत्त्वाचे मानले जाते.
हॉटेल्स, फाईन डायनिंग रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट्स, वाइनरी, लिकर कंपन्या, आयात-निर्यात कंपन्या तसेच वाइन सल्लागार (Consultant) किंवा प्रशिक्षक म्हणूनही करिअर करता येते.
नवीन उमेदवारांना साधारण ५०,००० प्रतिमहिना पासून पगार मिळू शकतो. अनुभव आणि संस्थेनुसार हे उत्पन्न आणखी वाढू शकते. परदेशात या क्षेत्रात अधिक आकर्षक पगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
इंडियन वाइन अकादमी (दिल्ली), मणिपाल विद्यापीठ (कर्नाटक), KBR School of Wine (मुंबई) आणि Wine Academy of India (चेन्नई) यांसारख्या संस्थांमध्ये संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
खाद्यपदार्थ, पेये, हॉस्पिटॅलिटी आणि चव-विश्लेषण यामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे करिअर उत्तम पर्याय ठरू शकते. योग्य प्रशिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात.