Manasvi Choudhary
एका व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
मुलांनी दिवसाला कमीत कमी 1 ते 1.3 लिटर पाणी प्यावे. तसेच दूध, सूप, फळांचा रस यामधूनही पाण्याची गरज पूर्ण होते. वारंवार थोडेथोडे पाणी द्यावे.
महिलांनी दिवसातून २.७ लिटर म्हणजेच अंदाजे ८ ते ९ ग्लास पाणी पिणे योग्य आहे.
पुरुषांनी दिवसातून ३.७ लिटर म्हणजेच अंदाजे ११ ते १२ ग्लास पाणी पिणे योग्य आहे.
जे लोक जिममध्ये व्यायाम करतात, मेहनतीचे काम करतात अशा लोकांनी सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक पाणी पिणे महत्वाचे आहे.
जर एखाद्या व्यक्तीला ताप, उलट्या किंवा जुलाब झाले असतील, तर शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाण्याचे प्रमाण वाढवावे लागते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.