अर्ध हलासनाचे फायदे Saam Tv
लाईफस्टाईल

Daily योग: अर्ध हलासनाचे फायदे कोणते?

'अर्ध हलासन' करताना आपले शरीर हे अर्ध्या नांगराप्रमाणे दिसते. उच्चरक्तदाब, बद्धकोष्ठता यांसारखे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकारे हे आसन नियमित केल्यास त्याचा शरीराला फायदा होतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'अर्ध हलासन' करताना आपले शरीर हे अर्ध्या नांगराप्रमाणे दिसते. उच्चरक्तदाब, बद्धकोष्ठता यांसारखे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकारे हे आसन नियमित केल्यास त्याचा शरीराला फायदा होतो. Daily Yoga: What are the benefits of Ardh Halasana ?

अर्ध हलासन कसे करावे?

- पाय जमिनीला टेकवून हात आणि पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील अशा स्थितीत पाठीवर झोपा.

- दोन्ही पाय एकमेकांना जुळवून गुडघ्यांत न वाकवता हळूहळू वर नेत ३० अंशाच्या कोनात आणा.

- काही क्षणांनंतर दोन्ही पाय ६० अंशाच्या कोनात आणा.

- पाय हळूहळू आणखी वर नेत काटकोनात आणा.

- ही आसनाची अंतिम स्थिती असेल. अर्ध हलासन करताना कमरेपासून खांद्यांपर्यंतचा भाग सरळ असणे आवश्यक आहे.

- अंतिम स्थितीत सहज शक्य असेल तेवढा वेळ राहा. त्यानंतर हळूहळू पाय पुन्हा जमिनीवर सरळ रेषेत आणा.

अर्ध हलासनाचे फायदे-

- व्हेरिकोज वेन्सचा (varicose veins) आजार असलेल्यांनी हे आसन केल्यास फायदेशीर ठरेल.

- या आसनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

- पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

- ओटीपोटातील स्नायू, मांड्या आणि पायांचे स्नायू बळकट करते.

- रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT