Walking Saam Tv
लाईफस्टाईल

Walking: वजन कमी करण्यासाठी खूप चालताय का? पण या ७ चुका टाळा; अन्यथा...

Keep These 7 Things in Mind Before Walking: चालल्याने वजन कमी होते. मात्र, चालताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. अन्यथा त्याच्या तुमच्या शरीरावर वेगळाच परिणाम होऊ शकतो.

Siddhi Hande

चालणे हा एक खूप चांगला व्यायाम आहे. रोज तुम्ही चाललात तर तुमच्या शरीरावर त्याचे खूप चांगले परिणाम होतात. तसेच तुमचे वजन कमी करण्यासाठीही मदत होते. दरम्यान, चालतानादेखील काही गोष्टींची काळजी घ्यायची असते अन्यथा तुमचे वजन कमी होणार नाही.

वजन कमी करण्यासाठी वेगाने चालणे

तुम्ही जर सामान्य गतीने चालत असाल तर तुम्हाला आरामदायी वाटू शकते. परंतु यामुळे शरीरातील चरबी कमी होणार नाही. तुम्हाला शरीरातील चरबी कमी करण्यासाठी वेगाने चालणे आवश्यक आहे. तुम्हाला प्रति मिनिटे १०० ते १२० पावले चालणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होतात.

वॉर्म अप करणे

चालायला जाण्यापूर्वी तुम्हाला वॉर्म अप करायला हवे. जर तुम्ही अचानक चालायला थांबवले तर तुमचे स्नायू घट्ट होता, थकवा येतो त्यामुळे तुम्हाला वॉर्म अप करणे गरजेचे आहे. स्ट्रेचिंगमुळे स्नायू स्ट्रेच होतात. त्यामुळे चालण्यास मदत होते.

योग्य पद्धतीने चालणे

जर तुम्ही कुबड्या काढत किंवा फोनकडे बघत चालत असाल याचसोबत पाय ओढत चालत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. चुकीच्या पोश्चरमुळे ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे मानेवर आणि पाठीवर ताण होतो. यामुळे कॅलरीज बर्न होत नाही. यामुळे चालताना योग्य पद्धतीने चालावे.

चुकीचे शूज घालणे

चालताना नेहमी चांगले शूज घालावे. जर तुम्ही एकदम घट्ट शूज किंवा चप्पल घातली तर त्यामुळे चालताना खूप त्रास होईल. यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे.

रोजची सारखी दिनचर्या

तुम्ही रोज चालताना काहीतरी नवीन गोष्टी करायला हव्यात. जेणेकरुन कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. तुम्हाला मध्येच स्पीड वाढवायला हवा किंवा टेकड्यांवर चालायला जा. तुमच्या चालण्याचे अंतर वाढवा.

हायड्रेट राहणे (Keep Body Hydrated)

चालताना शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे खूप आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या शरीराला नेहमी हायड्रेट ठेवा. डिहायड्रेशनमुळे मेटाबॉलिजम कमी होते, यामुळे भूकदेखील लागू शकते.

चालल्यानंतर जास्त खाऊ नये (Overeating after walking)

अनेकदा चालल्यानंतर तुम्हाला खूप भूक लागते. परंतु चालल्यानंतर जास्त काही खाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड किंवा स्नॅक्स हे पदार्थ खाणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT