

आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण लगेच ती जाऊन गुगलवर सर्च करतो. असंच यावर्षी भारतीयांनी आरोग्यविषयक माहिती सर्च करण्यासाठी गुगलला प्रथम प्राधान्य दिलं असून ते सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ ठरलंय. हलकी डोकेदुखी असो किंवा तीव्र ताप, हात-पाय सुन्न पडणं असो किंवा पोटदुखी या उपचार घेण्यापूर्वी अनेकांनी गुगलवर सर्च करून माहिती घेतली आहे.
बहुतेक लोक डॉक्टरांकडे जाण्याआधी इंटरनेटवर शरीरात नेमकी काय समस्या आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण वर्षभरातील गूगल ट्रेंड्सने हे दाखवलंय की, भारतातील युझर्स कोणत्या आरोग्याची माहिती सर्वाधिक घेतात.
ताप हा 2025 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक गूगल केलेली समस्या आहे. साधारणपणे शरीराचं तापमान वाढतं. भारतीय लोकांनी गुगलवर याबाबत सर्वाधिक माहिती सर्च केली आहे.
डोकेदुखी हे भारतात सर्वाधिक शोधलं जाणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपैकी एक आहे. ही सामान्य समस्या असली तरी ती वाढत गेल्यास गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.
खोकला हा भारतात सर्वाधिक गूगल केली आजारी अजून एक समस्या आहे. खोकला हा साध्या ऍलर्जीपासून ते गंभीर फुफ्फुसांच्या आजारापर्यंतचे संकेत देऊ शकतो. हवामान बदल, प्रदूषण वाढ, धूळ-माती किंवा व्हायरल संसर्गामुळे खोकला सुरू होतो.
यंदाच्या वर्षी भारतीयांनी खशात होणाऱ्या खवखवीबाबत देखील इंटरनेटवर सर्च केलं आहे. यामागे प्रदूषण, व्हायरस, बॅक्टेरिया, ऍलर्जी, टॉन्सिलाइटिस अशी कारणं असू शकतात.
अंगदुखी किंवा शरीर दुखणं आता भारतात अत्यंत सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी ही समस्या प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसत होती, पण आता ती तरुणांमध्ये आणि अगदी मुलांमध्येही वाढताना दिसतेय. अनेक दिवसांपासून शरीर किंवा सांध्यांमध्ये वेदना कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
छातीत दुखणे हे चिंताजनक समस्यांपैकी एक आहे. भारतीयांनी याबाबतही इंटरनेटवर सर्च केलं आहे. छातीत दुखल्यानंतर लगेच लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.
अनेकांना कोणताही त्रास झाला की उलटी होते. भारतीयांनी याबाबत देखील गुगलवर सर्च केलं आहे. यावर उपचार कसे केले जातात याबाबत लोकांनी सर्च केलं आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.