Janmashtami 2022
Janmashtami 2022 Saam TV
लाईफस्टाईल

Janmashtami 2022 : मच गया शोर सारी नगरी रे, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी का साजरी केली जाते ?

कोमल दामुद्रे

Janmashtami 2022 : श्रावण महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते. या वर्षी कृष्ण जन्माष्टमी ही १८ ऑगस्ट आणि १९ ऑगस्ट २०२२ या दोन्ही दिवशी साजरी केली जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते.

दहीहंडी हा सण (Festival) थाटामाटात साजरा केला जातो. हा सण लहान मुलांच्या करमणुकीचा एक भाग मानाला जातो. भारतातील अनेक शहरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण कधी साजरा (Celebrate) केला जातो हे जाणून घ्या.

दहीहंडीचे महत्त्व -

दहीहंडीचा हा सण श्री कृष्ण जन्माष्टमीच्या जयंती दिनी हा सण साजरा केला जातो. या उत्सवात भगवान श्रीकृष्ण लहानपणी शेजाऱ्यांच्या घरचे दही, दूध आणि लोणी खात होते, असे मानले जाते. दहीहंडीच्या सणात मडके फोडण्याची परंपराही आहे. दहीहंडी उत्सव हा कान्हाच्या लहान मुलांच्या करमणुकीशी संबंधित आहे, ज्याद्वारे कृष्णाची पूजा केली जाते. दहीहंडीच्या माध्यमातून कृष्णाच्या बाल लीलाला रुप पुन्हा पाहावयास मिळते.

दहीहंडी कधी आहे?

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त दहीहंडीचा सण येत आहे. या अष्टमीच्या दिवशी, कृष्णाचा जन्म मध्यंतरी झाला आहे. यंदा हा सण १८ ऑगस्ट आणि १९ ऑगस्ट या दोन्ही दिवशी साजरी करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्मष्टामीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

दहीहंडी उत्सवाची परंपरा -

भगवान श्रीकृष्ण लहानपणी खूप खोडकर होते. आपली सखा मंडळी मिळून शेजारच्या घरातून हंडी फोडून लोणी, दूध, दही चोरून खात. कान्हाच्या या खोडीमुळे त्याच्यावर अनेक स्त्रीया रागवत असत व लोणी, दही सुरक्षित ठेवण्यासाठी त्या ते उंचावर टागत असत.

ही हंडी गाठण्यासाठी व लोणी चोरण्यासाठी ते मित्रांसोबत हंडी बनवून माखन चोरत असे. तेव्हापासून दहीहंडी हा सण भारतीय संस्कृतीत एक मजेदार सण बनला आहे. भारतातील जवळपास सर्वच भागात दहीहंडी भक्ती आणि उत्साहाने साजरी केली जाते. यावेळी गोपाळांन उंचीवरून लटकवलेले मातीचे भांडे तोडावे लागते. हे अत्यंत शुभ मानले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT