PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

PAN Linked To Aadhaar Card: पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक न केलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही निष्क्रिय झालेले पॅनकार्ड वापरत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. नेमकं काय आहे वाचा सविस्तर...
PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही?  नवा नियम लागू, बसेल मोठा फटका
Pan Card Saaam tv
Published On

सध्याच्या काळात पॅन कार्ड आणि आधार कार्डशिवाय कोणतीही महत्वाची कामं होत नाही. पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्वाचे दस्तऐवज आहेत. त्याचसोबत या दोन्हींशिवाय कोणतेही आर्थिक काम पूर्ण करणे शक्य नाही. हे लक्षात घेता सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. अजूनही अनेक लोकांनी त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नाही. अशा लोकांचे पॅन कार्ड देखील निष्क्रिय झाले आहे. असे असताना आता आयकर कायद्याच्या कलम २७२ ब अंतर्गत आर्थिक व्यवहारांमध्ये निष्क्रिय पॅन वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

पॅन कार्ड म्हणजे काय?

पॅन हा आयकर विभागाकडून व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना जारी केलेला एक अद्वितीय १०-अंकी अल्फान्यूमेरिक ओळख क्रमांक आहे. प्रत्येक व्यवहारामध्ये पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो. विविध आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. बँक अकाऊंट उघडण्यासाठी, कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, आयकर रिटर्न भरण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास भरावा लागेल दंड -

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. प्राप्तिकर विभागाने घालून दिलेल्या नियमांनुसार व्यक्तींना एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावावर फक्त एकच पॅन कार्ड जारी करण्याची परवानगी आहे. जे त्याच्या विशिष्ट आहे आणि ते इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर आयकर विभाग आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ ब अंतर्गत कारवाई सुरू करू शकतो. या कलमाअंतर्गत एकापेक्षा जास्त पॅन कार्ड धारण करणाऱ्या व्यक्तीला १०,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे?

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर लिंकवर क्लिक करावा लागेल. यानंतर तुम्हाला येथे सेवाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला लिंक आधारचा पर्याय दिसेल. यानंतर तुम्ही Know About Aadhar Pan Linking Status या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही तुमचा पॅन आणि आधार तपशील भरा. यानंतर View Link Aadhar Status वर क्लिक करा. यानंतर आधार बटणावर क्लिक करा आणि अशा प्रकारे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com