Cyber Harassment : सोशल मीडियामुळे आपण एकमेकांसोबत जोडले गेलेले आहोत. त्याचबरोबर एकमेकांच्या विचारांच्या अभिव्यक्तीमध्ये विशेष मदत केली आहे. आपल्या प्रतिभेला प्रदर्शित करण्यासाठी सुद्धा मागील काही वर्षांमध्ये एक मोठे आणि खुले प्लॅटफॉर्म बनले आहे.
परंतु यामध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच नकारात्मक गोष्टी देखील आहे. आणि या गोष्टींवर गंभीरताने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
सायबरबुलिंग हा एक गंभीर विषय आहे. या गोष्टीवर चर्चा करने अत्यंत आवश्यक आहे. सायबरबुलिंगमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकांना घाबरवले आणि धमकवले जाते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की या गोष्टीचा प्रभाव व्यक्तींच्या मानसिक स्थितीवर पडू शकतो.
युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड लहान मुल आणि तरुणांवर होणाऱ्या मानसिक स्वास्थ्यावर असुरक्षित इंटरनेट आणि ऑनलाइन बुलिंग सारख्या होणाऱ्या समस्यांच्या दुष्परिणामांना घेऊन अलर्ट करते.
1. सायबरबुलिंग काय आहे ?
फेसबुक (Facebook), व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही कधी ना कधी व्यक्तींना ट्रोल झालेले पाहिले असेल. याला सायबरबुलिंगचे अंग मानले जाते. सायबरबुलिंगचा उद्देश सुनियोजित पद्धतीने लोकांना घाबरवणे, राग आणून देणे किंवा शर्मसार करने होय. हे कोणत्याही पद्धतीचे असू शकते. जसे सोशल मीडियावर एखाद्या विषयी खोटे पसरवणे किंवा लाज वाटण्यासारखा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हानिकारक आणि अपमानजनक किंवा धमकी देणे, चित्र किंवा व्हिडिओ पाठवणे किंवा फेक प्रोफाईल बनवून समोरच्याला फसवणे या सगळ्याला सायबरबुलिंग असे म्हटले जाते.
2. मस्करी आणि बुली करण्यामधील फरक जाणून घ्या -
अनेकवेळा आपण मित्र (Friends) एकमेकांसोबत मस्करी करत असतो. पण याची एक लिमिट असते. हे लिमिट क्रॉस करून एखाद्या व्यक्तीला त्रास देणे, त्याला हीनवने आणि एखाद्या उद्देशावर मस्करी करणे हे सगळं बूली श्रेणीमध्ये येते. खासकरून ऑनलाइन माध्यमानमध्ये याकडे गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक असते. ऑनलाइन फसवणुकीचे परिणामस्वरूप अनोळखी लोकांच्या वागण्याकडे लक्ष जाते. मस्करी आणि फसवणुकीच्या मधील हे अंतर समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
3. सायबर क्राईमचे दुष्परिणाम -
सायबर क्राईम भलेही ऐकण्यासाठी सामान्य वाटत असेल परंतु याचे गंभीर परिणाम भोगायला लागतात. काही गोष्टींमध्ये हे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवते. फसवणूक झाल्यावर व्यक्तीला त्रास, लाज, घाबरणे किंवा क्रोधित होणे यांसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. याचा प्रभाव शारीरिक स्वास्थ्यावर होतो. ज्यामुळे थकवा जाणवणे, झोप कमी होणे, डोके दुखणे यासारखे लक्षणे (Symptoms) दिसून येतात.
4. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम -
सायबरबुलिंगचा जास्त प्रभाव मानसिक स्वास्थ्यावर (Mental Health) पाहायला मिळतो. या कारणामुळे लोकांमध्ये लाज, घाबरणे, चिंता आणि सुरक्षितपणा यांसारख्या भावना वाढू लागतात. बाहेरची लोक आपल्याबद्दल काय विचार करतील या विचाराने तो व्यक्ती त्रासून जातो. अशा प्रकारच्या भावना नकारात्मक विचारांना वाढवतात. त्याचबरोबर यामध्ये चिंता - तनाव आणि डिप्रेशन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
5. आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे -
शोधकर्त्यांच्या हिशोबाने सायबरबूलिंगच्या गोष्टींमध्ये व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करतो. घाबरवणे आणि धमकी देणे यासारख्या गोष्टींमुळे व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी मजबूर होतो. अशा प्रकारच्या बातम्या नेहमी समोर येत असतात. स्वास्थ्य विशिष्ट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मानसिक स्वास्थ्य समस्यांच्या निदानामध्ये या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. ज्यामध्ये व्यक्तीच्या मानसिक स्थितीचे आकलन केले जाऊ शकते.
6. लहान मुले आणि तरुणवर्ग विशेष लक्ष द्या -
युनिसेफ विशेषतज्ज्ञ म्हणतात की, लहान मुले आणि तरुण व्यक्ती सोशल मीडिया जास्त प्रमाणात हाताळतात. त्यामुळे सायबरबुलींग पासून कसे वाचायचे हे त्यांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेगवेगळे टूल प्रदान करतात. ज्याच्या माध्यमाने तुम्ही प्रायव्हसीचा वापर करू शकता. कोण तुमच्या पोस्ट वरती टिपण्णी करत आहे किंवा तुमची पोस्ट पाहत आहे, कोण मित्राच्या रूपामध्ये तुमच्या सोबत जोडला जातोय, अशा पद्धतीची प्रायव्हसी लावून तुम्ही ऑनलाईन बुलिंग कमी करू शकता.
7. सायबरबुलिंगचा अनुभव येत असेल तर काय करावे ?
अशावेळी तुम्ही तुमच्या आई वडिलांची, किंवा परिवारामधील कोणत्याही जवळच्या व्यक्तीची मदत घेऊ शकता.
त्याचबरोबर तुम्ही तुमच्या शाळेमधील एखाद्या कॉन्सिलर, प्रशिक्षक किंवा आपल्या आवडत्या शिक्षकांसोबत याबद्दल चर्चा करा.
जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करायचे नसेल तर तुम्ही हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित रूपामध्ये वापर करा, आणि दुसऱ्याला सुद्धा सुरक्षित बनवण्यासाठी मदत करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.