RTO Online Service : ड्रायव्हिंग लायसन्सपासून ते वाहन ट्रान्सफरपर्यंत आरटीओची प्रत्येक काम होणार आता सोपे! असा भराल फॉर्म

Parivahan Sewa : आरटीओशी संबंधित कामासाठी लोक दलालांना पैसे देतात असे अनेकवेळा दिसून येते.
RTO Online Service
RTO Online ServiceSaam Tv
Published On

RTO Services Online : आरटीओशी संबंधित कामासाठी लोक दलालांना पैसे देतात असे अनेकवेळा दिसून येते. मात्र, तुम्हाला हे करण्याची गरज नाही, कारण आज आम्ही अशा वेबसाइटबद्दल सांगणार आहोत, जिथे ड्रायव्हिंग लायसन्स ते आरसी ट्रान्सफर अशा अनेक गोष्टी करता येतील.

वाहन चालवण्याचा परवाना असो किंवा वाहनाचे (Vehicle) आरसी हस्तांतरण असो , अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ( RTO ) भेट द्यावी लागते. वाहतुकीशी संबंधित अनेक कामे आरटीओकडूनच केली जातात .

RTO Online Service
E-Challan : तुमच्या वाहनावर RTO चा किती दंड? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरबसल्या पाहा

त्यामुळे लोकांना अनेकदा तिथे जावे लागते. काही काळापासून सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी आरटीओच्या (RTO) अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. म्हणजे आता तुम्हाला आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. यासाठी एक खास वेबसाईट आहे, ज्याची माहिती आम्ही पुढे देत आहोत.

या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही आरटीओशी संबंधित अनेक प्रकारची कामे करू शकता. मात्र, काही कामांसाठी आरटीओमध्ये जावे लागू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही नवीन लर्निंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सुधारण्यासाठी या वेबसाइटचा वापर करू शकता.

RTO Online Service
RTO Choice Number : हौसेला मोल नसतं ! चाॅईस नंबरसाठी माेजले सव्वा काेटी रुपये

दलालांपासून मुक्त व्हा -

आरटीओमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय आरसी ट्रान्सफर, फिटनेस टेस्ट, रोड टॅक्स, फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर प्लेट, परमिट अशी अनेक कामे आहेत. अनेकदा लोक त्यांचे काम करून घेण्यासाठी दलालांना पैसेही देतात.

आरटीओच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी ते दलालांच्या तावडीत अडकतात. पण या वेबसाईटवरून तुम्ही RTO ची अनेक कामे घरी बसून करू शकता आणि त्यासाठी दलालांकडे जाण्याची गरज नाही.

या वेबसाइटमुळे काम सोपे होईल

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालयाने परिवहन सेवा नावाची वेबसाइट विकसित केली आहे. या वेबसाइटच्या मदतीने तुम्ही घरबसल्या आरटीओच्या विविध सेवांसाठी अर्ज करू शकता. लर्निंग लायसन्सची चाचणी तुम्ही घरबसल्याही देऊ शकता. यासाठी वापरकर्त्यांना https://parivahan.gov.in/parivahan/ वर जावे लागेल.

असा फायदा घ्या -

तुम्ही परिवहन सेवा पोर्टलवरून आरटीओशी संबंधित अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता. या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. येथे ऑनलाइन सेवेचा पर्याय देण्यात आला आहे, तेथून तुम्ही तुमच्या कामानुसार पर्याय निवडून या वेबसाइटची सेवा घेऊ शकता. मात्र, काही कामांसाठी आरटीओमध्ये जावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com