Cyber Crime Saam Tv
लाईफस्टाईल

Cyber Crime: Alert ! इंटरनेटवर सर्च करताय? काळजी घ्या; अन्यथा येईल पश्चातापाची वेळ!

Cyber Crime News: इंटरनेटवर कोणतीही गोष्ट सर्च करण्यापूर्वी सतर्क राहणे गरजेचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Do Not Search These Things On Internet:

संपूर्ण जग सध्या इंटरनेटवर अवलंबून आहे. कोणतीही माहिती सर्च करताना आपण सर्वात आधी इंटरनेटचा वापर करतो. परंतु इंटरनेटवर कोणतीही गोष्ट सर्च करण्यापूर्वी सतर्क राहणे गरजेचे आहे.

इंटरनेटवर कोणत्याही बँक किंवा कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधणे हे सायबर क्राइमचे मुख्य कारण आहे. यामुळेच फ्रॉड होतात. बँक किंवा कंपनीच्या बनावट कस्टमर केअर नंबरद्वारे फसवणूक करणे हे सायबर क्राइममध्ये सर्वात मोठा गुन्हा बनला आहे.

इंटरनेटवरील कोणत्याही सर्च इंजिनमध्ये टॉप लिंकवर दिसणारे नंबर सायबर फसवणूक करणाऱ्यांचेही असू शकतात. त्यामुळे त्यावर क्लिक करु नका. असे केल्याने तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. यामुळे नेहमी गुगल किंवा कोणत्याही सर्च इंजिन साइटवर बँकेचे नंबर शोधणे टाळा. त्याऐवजी तुम्ही बँकेच्या किंवा कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन नंबर शोधा.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्च इंजिनवर दोन प्रकारचे नंबर आणि लिंक असतात. एक नंबर 'Ad' सोबत लिंक केलेला असतो. त्यावर कधीच क्लिक करु नये. हा नंबर Paid Ad द्वारे प्रमोट केलेला असतो. दुसरा नंबर कोणत्याही बँकेच्या किंवा कंपनीच्या वेबसाइटवर दिलेला असतो. वेबसाइटवर असलेल्या यूआरएलमध्ये डॉट, ड्रश, स्लॅश यामध्ये फरक असतो. हा नंबर किंवा यूआरएलला बँकेने डिझाइन केलेले असते. त्यामुळे त्यातील फरक ओळखूनच कोणत्याही क्लिकवर किंवा नंबरवर क्लिक करा.

नंबर सर्च करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • कोणत्याही बँकेच्या वेबसाइटवर जाण्याआधी त्याची यूआरएल नीट चेक करा.

  • कंपनीच्या वेबसाइटला भेट दिल्यावर अॅड्रेसमध्ये कंपनीची स्पेलिंग नीट चेक करा

  • कंपनीची स्पेलिंग चुकीची लिहिली असेल तर वेबसाइटदेखील चुकीची असेल.

  • वेबसाइट पेजच्या सर्वात खाली Contact us, Helpline किंवा Support चा ऑप्शन दिलेला असतो.

  • फ्रॉड झाल्यास लगेचच 1930 नंबरवर कॉल करा किंवा सायबर क्राइम पोर्टल cyber crime.gov.in वर तक्रार दाखल करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT