Curry Leaves Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Curry Leaves Benefits : या आजारांपासून संरक्षण करेल फोडणीतला कढीपत्ता ! जाणून घ्या, त्याचे फायदे

भारतीय स्वयंपाकघरात फोडणीशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येणे कठीणच !

कोमल दामुद्रे

Curry Leaves Benefits : भारतीय स्वयंपाकघरात फोडणीशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येणे कठीणच ! स्वयंपाकघरातील बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना कढीपत्त्याची फोडणी दिल्याने चव येते.

कढीपत्त्याची फोडणी दिल्ल्याने पदार्थाला चव ही येते व त्याचा सुंगंध देखील वाढतो. कढीपत्ता जितका स्वयंपाकघरात फायदेशीर आहे तितकाच तो आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

त्याची हिरवी पाने वारंवार दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ जसे की सांभार, रसम, चटणी इत्यादींमध्ये वापरली जातात किंवा मसाला म्हणून वापरली जातात. याचा स्वयंपाकघरात कसा वापर करता येईल व त्याचे फायदे काय हे जाणून घेऊया. (Benefits Of Curry Leaves In Marathi)

आपल्या आहारात कढीपत्ता कसा घालावा -

१. आपण डाळीला फोडणी देताना किंवा दाल तडका देताना याचा वापर करु शकतो. हे स्वादिष्ट चवीसह उत्कृष्ट शाकाहारी प्रथिने स्त्रोत आहे. दाल तडकामध्ये कढीपत्ता घातल्याने तुमच्या डाळीची चव सुधारते आणि त्यात अधिक पौष्टिकता वाढते.

२. हिरव्या पालेभाज्या, गोठलेले आंब्याचे तुकडे, केळी, नारळाचे दूध आणि थोडासा संत्र्याचा रस वापरून ग्रीन स्मूदी खूप ताजेतवाने असते. त्यात कढीपत्त्याची चव जोडणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्मूदी आरोग्याला निरोगी बनवते आणि त्याच्या चवही वाढते. मुलांसाठी हे उत्तम आहे कारण त्यांना कढीपत्त्याची सर्व पोषकतत्वे स्मूदीच्या रूपात मिळू शकतात.

३. ताक पिण्याचे शौकिन असाल तर आपण त्याची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता, मीठ, काळी मिरी पावडर आणि हिरवी मिरची घालून सर्व बारीक करून घ्या, नंतर त्यात ताक घाला आणि चांगले मिसळा.

कढीपत्त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे -

Curry leaves Benefits

१. कढीपत्ता हे जीवनसत्त्वे (Vitamins) ए, ब आणि क सारख्या आवश्यक पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. कढीपत्त्याचे सेवन केल्याने बऱ्याच आरोग्याच्या समस्यांशी लढा देण्यात आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत होते.

२. कमीत कमी महिनाभर रोज रिकाम्या पोटी कढीपत्त्याची चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच सकाळी १० ते १५ कच्च्या पानांचे सेवन करू शकता, त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊ शकता.

३. कढीपत्ता आपल्या शरीराचे विविध कर्करोगांपासून बचाव करू शकतो. त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

४. कढीपत्त्यात भरपूर फायबर असते. असे आढळून आले आहे की फायबरयुक्त आहार मधुमेहासाठी फायदेशीर आहे. ते शरीर ज्या दराने साखर शोषून घेते ते कमी करण्यात मदत करू शकतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

५. तसेच कढीपत्त्याचे सेवन केल्याने केसांचे (Hair) आरोग्य सुधारते. चेहऱ्यावरील डाग व मुरुमांची समस्या देखील कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT