Healthy Snacks : तुम्हाला आरोग्यदायी स्नॅक्स खायचे आहे ? काकडीची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा

काकडी आपल्या शरीरासाठी कशी फायदेशीर आहे हे जाणून घ्या
Cucumber Benefits
Cucumber Benefits Saam Tv

Healthy Snacks : आपल्या प्रत्येकाला असे वाटते की, आपण अनेक आजारांपासून दूर राहायला हवे. त्यासाठी आपण आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतो.

सायंकाळच्या वेळी किंवा सकाळी आरोग्यदायी स्नॅक्स खाण्यासाठी आपण वारंवार ट्राय करत असतो. परंतु, आपल्या आहारात फळे व भाज्यांचा समावेश केल्यास त्याचा फायदा होतो.

काकडीत आपल्याला दररोज आवश्यक असलेले सर्वात जास्त जीवनसत्त्वे मिळतात. काकडीत जीवनसत्त्वे (Vitamins) ब-१, ब-२, ब-३, ब-५ व ब-६ आणि फॉलिक ऍसिड, जीवनसत्त्व क, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक आढळते.

Cucumber Benefits
Benefits Of Lemon Tea : वजन कमी करायचे आहे ? चयापचयमध्ये सुधारणा करायची आहे ? या चहाचे सेवन करा

दुपारी थकल्यासारखे वाटत असेल तेव्हा आपण कॉफी (Coffee) किंवा सोड्याऐवजी काकडीचे सेवन करायला हवे. काकडीत असणारे घटक आपल्याला जीवनसत्त्व पूरवते व इलेक्ट्रोलाइट्सचा चांगला स्रोत आहेत. हे आपल्या पेशींना काही तासांसाठी पुन्हा ऊर्जा देऊ शकते.

काकडीचे सेवन केल्याने दिवसाची चांगली सुरुवात होऊ शकते. आपल्या आहारात काकडीचे फायदे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.

काकडीचे सॅण्डविच कसे बनवाल

साहित्य -

दही - १/२ वाटी

चिरलेले गाजर - १/२ वाटी

चिरलेली काकडी - १/२ वाटी

चिरलेली भोपळी मिरची- १/२ वाटी

मीठ

कृती -

Cucumber Sandwich
Cucumber SandwichCanva

१. सर्वप्रथम दही घेऊन त्यात थोडे बारीक चिरलेले गाजर, काकडी आणि भोपळी मिरची घाला. ते दह्यामध्ये चांगले मिसळा.

२. आता काकडीचे तुकडे घ्या आणि त्यातील एकावर हे मिश्रण घाला. त्यावर दुसरी काकडी झाकून ठेवा.

३. तुमचे काकडीचे सॅण्डविच तयार आहे.

काकडीच्या सॅण्डविचचे काय फायदे आहेत?

१. काकडीत काही प्रोबायोटिकमध्ये चांगले बॅक्टेरिया आहेत. जे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या कार्यक्षमतेसाठी चांगले असतात.

२. दही आणि काकडीत बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्या टाळण्याची क्षमता असते. या दोन्हीमध्ये पाणी आणि आहारातील फायबर असतात जे पचनासाठी चांगले असतात. त्यामुळे पोट निरोगी ठेवण्यासाठी दही आणि काकडी हे उत्तम मिश्रण आहे.

३. काकडीच्या सॅण्डविचमधील सर्व घटक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. ते चव आणि आरोग्यासाठी उच्च आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com