Beetroot paratha recipe Archana's kitchen / Freepik
लाईफस्टाईल

Beetroot Paratha : मुलांना नकळत हेल्दी फूड खायला घालायचंय? मग बीटापासून बनलेला हा पिंक पराठा नक्की ट्राय करा

Beetroot Paratha Recipe : मुलांना चवदार आणि हेल्दी जेवण द्यायचंय? मग बीटापासून तयार केलेला गुलाबी पराठा नक्की करून पाहा – मुलांना रंगही आवडेल आणि आरोग्यही टिकेल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लहान मुलांना रोज काही न काही नवीन खाण्याची इच्छा होत असते. तेही चटपटीत असायला हवं. हिरव्या भाज्या बघितल्यावर लहान मुलं लगेच नाक मुरडतात. अशात सर्व आईंसाठी त्यांच्या मुलांना हेल्दी फूड कसे खायला द्यावे हा एक मोठा टास्क असतो. यावर उपाय म्हणून तुम्ही बीटरूटचा पिंक पराठा बनवू शकता. जो चटपटीतही आहे आणि पौष्टिकही. चला तर मग लगेचच जाणून घेऊया सोपी आणि झटपट रेसिपी.

बीटरूट पराठा बनवण्यासाठी १ ते २ मध्यम आकाराचे बीट घ्या. ते सोलून घ्या. सोललेल्या बीटाचे लहान तुकडे करून घ्या. या बीटाच्या तुकड्यांची मिक्सरच्या सहाय्याने पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट करताना त्यात जास्त पाणी घालणे टाळा. यामुळे पेस्ट खुपच पातळ होण्याची शक्यता असते. यानंतर गरजेनुसार गव्हाचे पीठ मळून घ्या. पीठ मळत असताना त्यात बीटरूटची पेस्ट, चवीनूसार मीठ आणि थोडा ओवा घाला.

पराठ्याला आणखी पौष्टिक बनवण्यासाठी त्यात तुम्ही पनीरची स्टफिंग घालू शकता. पनीर स्टफिंग बनवण्यासाठी गरजेनुसार पनीर मॅश करून घ्या. त्यात कोथींबीर, हिरवी मिरची, गरम मासाला, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून मिश्रण तयार करा. हवे असल्यास बारीक चिरलेला कांदाही घालू शकता. आता नेहमी प्रमाणे पराठा बनवण्याच्या पद्धतीनुसार पीठाच्या गोळ्याची वाटी करा त्यात पनीर स्टफिंग भरा. आणि हलक्या हातांनी पराठा लाटून घेऊन भाजून घ्या. गरमागरम पौष्टिक आणि चविष्ट पराठा टोमॅटो सॉससह तुमच्या मुलांना सर्व्ह करा.

हा पराठा तुम्ही तुमच्या मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी नाश्ता म्हणून किंवा टिफीनमध्येही देऊ शकता. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि इ असतात. तसेच यामध्ये लोह, फोलेट आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे खनिजे असतात. जे मुलांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक मानले जातात. शिवाय पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असल्यामुळे हाडे व दात मजबूत होतात. स्नायूंच्या वाढीस मदत होते, शारीरीक आणि मानसिक विकासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

Accident News: भयंकर अपघात! दुचाकी समोरासमोर धडकल्या, पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

SCROLL FOR NEXT