Covishield Vaccine Saam TV
लाईफस्टाईल

Covishield Vaccine : तुम्हीही Covishield लस घेतली आहे? दुष्परिणामांसह तुमच्या जिवाला किती प्रमाणात धोका, वाचा सविस्तर

Covishield How Much Risk : वॅक्सीनचे साइड इफेक्ट असल्याचं ॲस्ट्राझेनेका कंपनीने स्वत: म्हटलं आहे. त्यामुळे वॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींच्या जिवाला कितीप्रमाणात धोका असू शकतो. भारतीय नागरिकांना धोका आहे का? याबाबत जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

भारतासह जगभरात २ वर्षांपूर्वी कोरोना या विषाणूने मोठं थैमान घातलं होतं. कोरोनाने या काळात अनेक बळी घेतले. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी जगभरातील संशोधकांनी संशोधन करून काही वॅक्सीन बनवल्या. त्यातीलच ॲस्ट्राझेनेका या कंपनीकडून बनवण्यात आलेली कोविशील्ड वॅक्सीन सध्या चर्चेत आली आहे. या वॅक्सीनचे साइड इफेक्ट असल्याचं ॲस्ट्राझेनेका कंपनीने स्वत: म्हटलं आहे. त्यामुळे वॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींच्या जिवाला कितीप्रमाणात धोका असू शकतो. भारतीय नागरिकांना धोका आहे का? याबाबत जाणून घेऊ.

रक्त गोठण्याची समस्या

कोविशील्ड लस घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसत आहेत. काही व्यक्तींच्या शरीरात या वॅक्सीनमुळे रक्ताच्या गाठी तयार होत आहेत, अशी माहिती ॲस्ट्राझेनेका या कंपनीने स्वत: दिली आहे. मात्र हे साइडइफेक्ट फार कमी प्रमाणात आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे.

भारतात किती व्यक्तींनी घेतली कोविशील्ड लस

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात जास्तीत जास्त कोवॅक्सीन आणि कोविशील्ड ही लस नागरिकांना देण्यात आली आहे. कोविशील्डचे 1 अब्ज 70 कोटी डोस भारतात दिले गेलेत. यामध्ये ९३ टक्के व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली आहे.

कोरोना लस घेतल्याची नोंदणी असलेल्या कोवीन COWIN अॅपवर दिसत असलेल्या माहितीनुसार, Covishield चे भारतात 1 अब्ज 70 कोटी डोस देण्यात आले आहेत. जर जगभरात ॲस्ट्राझेनेकाचे 2 अब्ज 50 कोटी पेक्षा जास्त डोस दिले गेलेत.

भारतीय नागरिकांना जास्त धोका नाही

आजतकने दिलेल्या रिपोर्टनुसार, साल 2021 मध्येच युरोपियन मेडिसिन एजन्सीने म्हटलं होतं की, ॲस्ट्राझेनेकाने दिलेल्या वॅक्सीनमुळे 222 लोकांना रक्त गोठण्याच्या समस्या निर्माण झाल्यात. या माहितीच्या आधारे भारतात देखील या लसीमुळे कुणाला नुकसान होत आहे का हे तपासण्यात आले होते. मात्र तसे काही आढळले नाही.

तज्ज्ञांनी यावेळी समिती स्थापन केली, देखरेखीसाठी वेगळे पथक नेमले. AEFI वरील रिपोर्टनुसार कोरोनासाठी कोविशील्ड लस घेतलेल्या नागरिकांचे निरिक्षण करण्यात आले. जर काही समस्या असत्या तर लगेचच किंवा १ ते २ महिन्यात त्याचे साइडइफेक्ट समोर आले असते. भारतात लसीकरणानंतर AEFI ची टक्केवारी 0.007% आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती आजतकने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT