Corona XBB 1.16 Variant
Corona XBB 1.16 Variant Saam Tv
लाईफस्टाईल

Corona XBB 1.16 Variant : कोरोनाचा XBB 1.16 व्हेरिएंट अधिक घातक ! या 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

कोमल दामुद्रे

Corona New Variant : भारतात कोरोना पसरण्याचा धोका पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. दररोज कोरोनाचे उप-प्रकार समोर येत आहेत, ज्यामुळे पुन्हा लोकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारताव्यतिरिक्त (India) जवळपास 13 देशांमध्ये कोरोनाचे 80 पेक्षा जास्त सीक्वेन्स XBB.1.16.1 सब-व्हेरियंट आढळले आहेत. कोरोना आता भारतासह इतर देशांमध्येही त्याचे स्वरूप बदलत आहे. देशात सातत्याने कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत.

देशातील सुमारे 9 राज्यांमध्ये या उप-प्रकारची 116 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सर्वात निराशाजनक बाब म्हणजे लहान मुलांनाही (Child) या संसर्गाचा फटका बसत आहे. त्याच्या नवीन लक्षणांमध्ये डोळे लाल होणे समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या मुलांना लाल डोळे दिसले तर लगेच डॉक्टरांशी (Doctor) संपर्क साधा.

ZOE आरोग्य अभ्यासानुसार , घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक भरणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी (Headache), कर्कश आवाज, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे ही कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. नवीन प्रकारांत क्लासिक लक्षणांचा नमुना आता बदलला आहे, आजकाल रुग्णांमध्ये काही असामान्य लक्षणे देखील दिसून येतात. जाणून घेऊया-

  • धाप लागणे

  • उलट्या

  • अतिसार

  • त्वचेवर पुरळ

  • बोटांच्या त्वचेचा रंग मंदावणे

  • पित्त

  • बोट सुजणे

  • डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा गुलाबी डोळा

  • प्रकाशाचा त्रास

  • डोळा दुखणे आणि खाज सुटणे

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

Mumbai University Exams | मुंबई विद्यापीठ, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल!

Devendra Fadnavis On Opposition | देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

Shantigiri Maharaj | नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरल्यानं दिवसभर चर्चा, शांतीगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?, Exclusive Video

SCROLL FOR NEXT