Copper Water Benefits
Copper Water Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Copper Water Benefits : तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे असंख्य फायदे, या व्यक्तींनी चुकूनही यात पाणी पिऊ नका

कोमल दामुद्रे

Copper Water Benefits : पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात तांब्या-पितळेची भांडी सहज पाहायला मिळायची, पण हल्लीच्या काळात ती पाहायला मिळत नाही. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने आरोग्याला असंख्य फायदे व्हायचे. सकाळी या भांड्यातील पाणी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.

तांब्याचे पाणी किती प्रमाणात प्यावे?

तुम्ही दिवसातून दोन ते तीन ग्लास तांब्याचे पाणी पिऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला त्याचे असंख्य फायदे (Benefits) होतील.

तांब्याच्या पाण्याचे काय फायदे आहेत?

तांब्याचे पाणी आरोग्यासाठी (Health) अधिक फायदेशीर आहे. पचन सुधारण्यापासून ते हाडे मजबूत करण्यासाठी, थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. हे सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते. हे पाणी वजन कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते. हे आतड्यांच्या हालचालीची प्रक्रिया सुलभ करते. आयुर्वेदानुसार, हे पाणी पित्त, कफ आणि वात या तीन दोषांमध्ये संतुलन राखण्याचे काम करते.

तांब्याचे पाणी कोणी पिऊ नये?

आयुर्वेदानुसार ज्या लोकांना बद्धकोष्ठता, जळजळ किंवा रक्तस्त्रावाचा त्रास होत असेल त्यांनी हे पाणी पिऊ नये. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

पाणी कसे प्याल ?

तांब्याचे भांडे किंवा बाटली घ्या आणि ती पूर्णपणे भरा आणि झाकून ठेवा. आता हे पाणी रात्रभर रेफ्रिजरेटरमध्ये किंवा थंड असलेल्या ठिकाणी ठेवा. जर तुम्हाला रात्रभर ठेवायचे नसेल तर दिवसातून ८ ते ९ तास तसेच ठेवा. हे पाणी पिण्याचा सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने फायदा होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Camphor Benefits: देवाला प्रसन्न करण्यासह आरोग्यासाठी कापूर आहे फायदेशीर

Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT