Cooking Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Cooking Tips : स्वयंपाक बनवण्यात एक्सपर्ट व्हायचंय? मग फॉलो करा आजीच्या या खास टिप्स

Making Cooking Tips : स्वयंपाकघरातील काम लवकरात लवकर पुर्ण करायचं असेल तर त्यासाठी आजीकडे अनेक उपाय उपलब्ध असतात.

Shraddha Thik

Cooking Tips :

स्वयंपाकघरातील काम लवकरात लवकर पुर्ण करायचं असेल तर त्यासाठी आजीकडे अनेक उपाय उपलब्ध असतात. मग ते जेवणात जास्त झालेल्या मीठाची मात्रा कमी करायची असेल किंवा भाजीला लवकरात लवकर शिजवायचं असेल. या उपायांच्या मदतीनं तुम्ही कुकिंग चॅम्पियन बनू शकता.

गृहिणीसमोर स्वादिष्ट जेवण बनवण्याबरोबरच स्वयंपाकघरातील काम कमी वेळात आणि कमीत कमी गोष्टींमध्ये कसे पूर्ण करता येईल हेही लक्षात ठेवावे लागते. ज्यानां जेवण बनवायच्या नावांन टेशंन येतं. तेव्हा बर्‍याच वेळा स्वयंपाक (Kitchen) करताना आपल्या आज्जी, आईने दिलेल्या जुन्या ट्रिक वापराव्या लागतात ज्यामुळे तुमचे बिघडलेले काम लवकर होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही किचन हॅक्सची ओळख करून देत आहोत ज्याच्या मदतीने तुमचे स्वयंपाकघरातील काम सोपे होईल.

अनेकदां कापलेली फळाच्या फोडी काळ्या पडतात. ती काळी पडू नयेत आणि बंद टिफिनमध्ये तशीच राहावीत यासाठी काय करावे?

आजीच्या बटव्यातील उपाय -

जर फळ काळी पडत असतील तर, त्यावर लिंबाचा रस किंवा मीठ टाकू शकता. फक्त एवढच लक्षात ठेवा की मीठ कमी प्रमाणात घालावे जेणेकरून फळांच्या कापलेल्या फोडीला पाणी (Water) सुटणार नाही.

बऱ्याचदा जास्त ग्रेव्हीवाल्या भाज्याना बनण्यास वेळ लागतो, हे करण्याचा सोपा उपाय कोणता?

आजीच्या बटव्यातील उपाय -

ग्रेव्हीवाल्या भाज्या बनण्यासाठी पांढऱ्या कांद्याचा वापर करावा. कारण पांढऱ्या कांद्यात पाण्याची मात्रा कमी असते. ज्यामुळे ग्रेव्हीही घट्ट होते. सोबतच ग्रेव्हीमध्ये धना पावडरचा वापर करू शकता. यामुळे ग्रेव्हीमधील मसाला लवकर शिजला जातो.

जर तुम्ही रात्री राजमा भिजवण्यासाठी विसरलात, अशामध्ये काय कराल ?

आजीच्या बटव्यातील उपाय -

राजमा नीट धुऊन स्वच्छ (Clean) करून घ्या त्यानंतर कुकरमध्ये योग्य प्रमाणात शिजवुन घ्या. पण त्यामध्ये आता एक बर्फाचा खडा आणि थोडं मीट घाला, यामुळे राजमा लवकर शिजतो.

कोशिंबीर बनवताना लगेच आंबट होते, तर काही लोक त्यात साखरही घालतात, पण तरीही आंबटच राहते, मग ते योग्य प्रकारे बनवण्यासाठी काय करावे ?

आजीच्या बटव्यातील उपाय -

कोशिंबीर बनवत असतानाच त्यामध्ये लगेच मीठ न टाकता जेवताना त्यामध्ये मीठ घालावे. याशिवाय जर तुम्ही दुपारच्या जेवणासाठी कोशिंबीर डब्यात भरून ठेवत असाल तर त्यामध्ये एक बर्फाचा खडा टाकावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT